#SushantSingh : रियाचे वकील मानेशिंदे म्हणतात, सीबीआय चैाकशीची नोटिस नाही...  - Riya's lawyer Maneshinde says there is no notice of CBI probe ... | Politics Marathi News - Sarkarnama

#SushantSingh : रियाचे वकील मानेशिंदे म्हणतात, सीबीआय चैाकशीची नोटिस नाही... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

सीबीआयची रियाला नोटिस मिळालेली नाही. नोटिस मिळाल्यावर रिया सीबीआयसमोर चैाकशीसाठी उपस्थित राहिल.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुशांतसिंह राजपूत याची मैत्रिण रिया चक्रवर्ती हिला अद्याप सीबीआयची नोटिस मिळाली नसल्याचे रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी सांगितलं.

सतिश माने शिंदे यांनी सांगितले की सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत सीबीआयची रिया किंवा तिच्या परिवारातील कुणालाही चैाकशीची नोटिस मिळालेली नाही. नोटिस मिळाल्यावर रिया सीबीआयसमोर चैाकशीसाठी उपस्थित राहिल.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सीबीआयने सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांना चैाकशीसाठी नोटिस पाठविली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यावर सतीश मानशिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 
 
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काल सुशांतच्या घरी जाऊन पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम निर्माण केला होता. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह आणि घरी काम करणारा दीपेश सावंत यांचीही सीबीआयने काल कसून चौकशी केली होती. सिद्धार्थ आणि नीरज यांच्या जबाबात विसंगती समोर आल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत तपासासाठी ता. 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक सांताक्रूज येथील सरकारी गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने प्रथम सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी केली. यानंतर पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पथक बांद्रा पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. सीबीआयच्या पथकाने काल चार तास पुन्हा एकदा सुशांतच्या घरची मॅपिंग केली. सुशांतच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न सीबीआयने केला. सुशांतचा मृतदेह हा कोणत्या दिशेला होता? त्याचे हात आणि पाय कशा पद्धतीने होते? त्याने उंचीमुळे पाय दुमडले होते का? या सर्व गोष्टी समजावून घेण्याचा सीबीआयने प्रयत्न केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख