रिया चक्रवर्ती म्हणते....आदित्य यांना ओळखत नाही! - Riya Chakraborty Claims I Don't know Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

रिया चक्रवर्ती म्हणते....आदित्य यांना ओळखत नाही!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने काही खुलासे केले असून, त्यात आदित्य ठाकरे यांच्याशी आजपर्यंत कधी भेट झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. अभिनेता डिनो मोर्या यांना आपण ओळखत असून, ते चित्रपटसृष्टीमध्ये वरिष्ठ अभिनेता आहेत. तसेच आपण सक्तवसुली संचनालय (ईडी) व मुंबई पोलिस दोघांनाही तपासात पूर्णपणे सहकार्य करत असल्याचेही रियाने म्हटले आहे

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीने आपली अधिकृत बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे. त्यात शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आपला काहीही संबंध नसून, त्यांना कधीही भेटलेली नाही. त्यांच्याशी कधीही फोनवरून बोलणे झालेले नाही. केवळ ते शिवसेनेचे नेते आहे. इतकीच माहिती असल्याचे म्हटले आहे. रियाच्या वतीने तिचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी हे  स्टेटमेंट जारी करण्यात केले आहे.

आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने काही खुलासे केले असून, त्यात आदित्य ठाकरे यांच्याशी आजपर्यंत कधी भेट झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. अभिनेता डिनो मोर्या यांना आपण ओळखत असून, ते चित्रपटसृष्टीमध्ये वरिष्ठ अभिनेता आहेत. तसेच आपण सक्तवसुली संचनालय (ईडी) व मुंबई पोलिस दोघांनाही तपासात पूर्णपणे सहकार्य करत असल्याचेही रियाने म्हटले आहे. 

याशिवाय तिने बिहार पोलिसांच्या तपासाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून, आपण याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात का धाव घेतली याचाही खुलासा केला आहे. मी भारतीय सेनेतील एका शल्यचिकित्सकाची मुलगी आहे. तसेच आपली आई एक महाराष्ट्रीयन गृहिणी आहे. मुंबई पोलिस व केंद्रीय यंत्रणांनी जेव्हा आपल्याला चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी त्यांना सहकार्य करत उपस्थित राहिले आहे, असे रियाने म्हटले आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक पुराव्याशी कोणतीही छेडछाड करणे शक्‍य नसते, तसेच कोणाविरोधातही चुकीचे केले जाऊ शकत नाही. तसेच प्रसिद्धी माध्यमांनी आपल्या विरोधात चुकीची माहिती न पसरवण्याची विनंतीही यावेळी तिने केली आहे. मी काही बोलत नाही, ती माझी दुर्बलता नका समजू. सत्य नेहमी सत्यच राहते व ते लवकरच समोर येईल, असेही तिने म्हटले आहे.

यंत्रणांना सहकार्य करणार
चौकशीमध्ये रिया व सुशांतमधील संबंध व त्यांच्यातील व्यवहाराबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. इलेक्‍ट्रॉनिक, डीएनए व फॉरेन्सिक पुरावेही घेण्यात आले. दोन्ही यंत्रणांकडे आपले बॅंक स्टेटमेंट, कर परतावा, सीसी टीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड व इलेक्‍ट्रॉनिक डाटा उपलब्ध आहे. त्यात काहीही सापडले नाही. याचे सर्व पुरावे मुंबई पोलिसांनी सीलबंद पाकिटात बंद करून न्यायालयात सुपूर्त केले आहेत. त्यानंतरही तिसरी यंत्रणा या प्रकरणात तपास करणार असेल तर आपण त्यातही सहयोग करण्यास तयार असल्याचेही रियाने सांगितले आहे.

८ जूनपर्यंत सुशांतसोबतच होती
रिया व सुशांत चांगले मित्र होते. दोघेही डिसेंबर २०१९ मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले व त्यानंतर माउंट ब्लॉकमध्ये रिलेशनमध्ये राहू लागले. ८ जूनपर्यंत ती सुशांतसोबतच होती. त्यानंतर ती तेथून घरी निघून गेली. २७ जुलैपर्यंत रियाविरोधात कोणीही तक्रार केली नव्हती. सुशांतला आपण आत्महत्येसाठी प्रवृत्त केले नाही. तसेच त्याच्यासोबत पैशांचे व्यवहारही नव्हते. यावेळी रियाने सुशांतच्या बहिणीवरही आरोप केला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख