लालूंना तुरूंगात पाठवणारे अमित खरे बनले पंतप्रधानांचे सल्लागार

खरे यांनी बिहारमधील चारा घोटाळाही समोर आणला होता.
Amit Khare
Amit Khare

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांना तुरूंगात पाठवणारे निवृत्त आयएएस अमित खरे (Amit Khare) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सल्लागारपती नियुक्ती करण्यात आली आहे. खरे हे 30 सप्टेंबर रोजी उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले आहेत.

केंद्र सरकारने मंगळवारी खरे यांच्या नियुक्तीचा आदेश काढला. खरे हे 1985 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने खरे यांच्या नावाच्या प्रस्तावावर मोहोर उमटवली आहे. त्यांना पंतप्रधान कार्यालयातील (PM Office) सचिव पदाचा दर्जा देण्यात आला आहे. पुढील दोन वर्षे ते या पदावर असतील. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला आकार देण्यातही खरे यांची मोलाची भूमिका राहिली आहे.

Amit Khare
पक्ष सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्याला मानाचं पान दिल्यानं भाजपमध्ये नाराजी

खरे यांनी माहिती व प्रसारण विभागाचे सचिव म्हणूनही काम केले आहे. या कार्यकाळात त्यांनी डिजिटल माध्यमांसाठीची नियमावलीमध्ये अनेक महत्वाचे बदल केले आहेत. पारदर्शक पध्दतीने निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा राहिला आहे. एकाचवेळी दोन विभागांचे सचिव म्हणून काम पाहिलेल्या मोजक्याच अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत.

अमित खरे यांच्याविषयी...

खरे हे 1985 च्या तुकडीचे झारखंड केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांच्या सेवेत केंद्र सरकारसह झारखंड व बिहार सरकारमध्ये महत्वपूर्ण पदांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच देशात 34 वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. उच्च शिक्षण क्षेत्राच्या धोरणांमध्येही त्यांनी अनेक बदल केले आहेत. ते मुळचे बिहारचे आहेत.

खरे यांनी बिहारमधील चारा घोटाळाही समोर आणला होता. ते सिंघभूम जिल्ह्यात उपायुक्त असताना या घोटाळ्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर लालुप्रसाद यादव यांच्यासह अन्य काही नेते व अधिकाऱ्यांना तुरूंगाची हवा खावी लागली. लालुप्रसाद यांना या प्रकरणात शिक्षाही झाली आहे. खरे यांच्या पत्नी निधी खरे या सध्या केंद्रीय ग्राहक मंत्रालयामध्ये अपर सचिव म्हणून कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com