राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक
Relaxation in restrictions in 25 districts of Maharashtra

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले जाणार आहेत. पण अपेक्षित रुग्णसंख्या कमी होत नसलेल्या 11 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली. (Relaxation in restrictions in 25 districts of Maharashtra)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या स्तरातील निर्बंध आहेत. पण मागील काही दिवसांपासून अनेक जिल्हयांमधील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील कमी करण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगाने आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश एक ते दोन दिवसांत काढण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांपैकी एकूण 25 जिल्ह्यांतील निर्बंध थिथील केले जाणार आहेत. पण या जिल्ह्यांमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले असल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले. यामध्ये मुंबईसह बहुतेक जिल्हे मराठवाडा व विदर्भातील आहेत. 

कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार?

निर्बंध कायम राहणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील रुगसंख्या आणकी वाढल्यास लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले जातील.

असं होईल अनलॉक

- निर्बंध शिथील केल्या जाणाऱ्या 25 जिल्ह्यांमधील दुकानांच्या वेळा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार दुकाने व हॉटेल आठ किंवा नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. पण तेथील कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक राहील.

- विकेंड लॉकडाऊन केवळ रविवारी कायम राहील. शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली जाईल. 

- चित्रपटगृह, मॉल, व्यायामशाळा यांना काही निर्बंध लागू करून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

- खासगी कार्यालये 50 कर्मचारी उपस्थितीसह सुरू करण्याची मुभा राहील. त्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. 

- लग्नाच्या निर्बंधांबाबतही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. लग्नासाठी एसी हॉलवर बंदी घातली जाऊ शकते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in