चिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं! - Raosaheb Danve criticize Bhaskar Jadhav over his controvercial comment-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

चिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं!

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जुलै 2021

भाजपकडून जाधव यांच्याविरोधात आघाडी उघडण्यात आली असून ठिकठिकाणी निषेध केला जात आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे. भाजपकडून जाधव यांच्याविरोधात आघाडी उघडण्यात आली असून ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही जाधव यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. (Raosaheb Danve criticize Bhaskar Jadhav over his controvercial comment)

जाधव हे उद्दामपणे बोलल्याचा अनेकांचा आरोप होता. मात्र आपण वडिलकीच्या नात्याने तसे बोलल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित महिलेनेही जाधव यांच्या बोलण्याचा राग आला नसल्याचे सांगितले आहे. भास्कर जाधव यांचा आवाजच रावडी राठोडसारखा आहे. त्यामुळे तुम्हाला ती अरेरावी वाटली असेल. भास्कर जाधवांशी आमचे चांगले संबंध आहेत, असे या महिलेने म्हटले आहे.

हेही वाचा : निवृत्त न्यायाधीश करणार फोन हॅकिंगची चौकशी; केंद्राऐवजी राज्यानंच घेतला निर्णय

सोमवारी दानवे यांनी पत्रकार परिषदेत जाधव यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भास्कर जाधव यांची ही भूमिका नाही तर सरकारचीच भूमिका आहे. मुख्यमंत्री तीन दिवसानंतर बाहेर पडले आहेत. मात्र, हा राजकीय मुद्दा होऊ नये. लोकांच्या भावनांचा उद्रेक होणं साहजिक आहे. माय बाप समजून जनता सरकार समोर आपले गाऱ्हाणे मांडते. पण जनतेसोबत अशा पध्दतीने वागणं कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभत नाही, अशी टीका दानवे यांनी केली. 

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे हे रविवारी चिपळूण येथे आले असता एका महिलेने एका महिलेनं आपले म्हणणे रडून सांगितले. त्या महिलेचा आक्रोश माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपला. "काहीही करा, पण आम्हाला मदत करा, फुल ना फुलाची पाकळी तरी द्या. आमदारांचा दोन महिन्यांचा पगार मदतीसाठी फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या." त्यांच्या या उत्तरावर जाधव यांनी आमदारांचे सहा महिन्यांचा पगार दिला तरी हा प्रश्न सुटणार नसल्याचे त्यांच्य नेहमीच्या मोठ्या आवाजात सांगितले आणि मुख्यमंत्र्यांना चला, चला, असे म्हणत तिथून काढले. आईची काळजी घे रे, असे सांगायलाही जाधव विसरले नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे जाधवांच्या विरोधात टिकेचे रान उठले.

हेही वाचा : दुर्दैवी : तळीयेत 31 जण सापडलेच नाहीत; शोधकार्य थांबवलं

त्यावर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले. ``राज्याचे मुख्यमंत्री उद्धववब ठाकरे यांनी चिपळूणमध्ये पूरस्थितीनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पुरामुळे झालेले नुकसान आणि प्रचंड हाल यामुळे येथील सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यामध्ये साहजिकच तीव्र संतापाची भावना होती. मुख्यमंत्री शहरात येताच नागरिकांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. अशावेळी लोकांची मानसिकता आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी स्वतः रस्त्यावर उतरलो. लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. निसर्ग व तौक्ते वादळानंतर कधी नव्हे एवढी मदत मा. उध्दवसाहेब यांनी केली. त्यामुळे यावेळीसुद्धा ते मदत देताना ते हात आखडता घेणार नाहीत, हे पटवून दिले. व्यापारी आणि सामान्य नागरिकांनाही ते पटले आणि त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.`` असे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच महिलेसोबत झालेल्य वादावर आपण वडिलकीच्या नात्याने बोलल्याचे माध्यमांशी सांगितले. 

संबंधित महिलेचे नाव ज्योती भोजने असे आहे. त्यांनी देखील भास्कर जाधव यांच्या बोलण्याचा आपल्याला राग आलेला नसल्याचे स्पष्ट केले. जाधव हे नेहमी सगळ्यांना मदत करतात. त्यांचं बोलणंच तसं आहे. पण त्यांचा उद्देश काही वाईट नव्हता. ते वडीलकीच्या नात्यातून आपल्याशी तसं बोलले," असे त्या  म्हणाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख