रावसाहेब दानवे, राजेश टोपे एका व्यासपीठावर; खोतकर मात्र दूरच

राज्यात आघाडी सरकार असले तरी या कार्यक्रमातून पालिकेने या भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना पालिकेत ११ नगर सेवक असतानाही खोतकर यांच्या नावावर फुली मारून आमदार गोरंट्याल यांनी डावल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा विरुद्ध शिवसेना असा वाद असल्याचे समोर येते आहे
Danve and Rajesh Tope on same dias at Jalana
Danve and Rajesh Tope on same dias at Jalana

जालना  : आज जालन्यात नगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरी सुविधा कामांचा उदघाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री राजेश टोपे ,आमदार कैलास गोरंटयाल यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. त्यामुळे या कार्यक्रमात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप एकत्रित आल्याचं चित्र पाहायला मिळाले. 

या कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचं नाव न घेता त्यांना टोला हाणला. नगराध्यक्षांनी आपल्या भाषणात तिघांच्या सहकार्याने पालिकेचा कारभार चांगला चालवीन असा उल्लेख केला. हाच धागा पकडत दानवे यांनी राज्यसरकार मधील तिघांपैकी आपण नाही, असे सांगत तीन जणांमध्ये मलाही चौथा म्हणून घ्यायला हवं होतं, असं वक्तव्य केलं. तर नगराध्यक्षांनी राज्यसरकारमधील तिघे नाही तर स्थानिक म्हणून तिसरे तुम्हीच असं सांगीतल्याने दानवे यांनी स्मित हास्य करून खोतकरांना एक प्रकारचा टोला हाणला.

राज्यात आघाडी सरकार असले तरी या कार्यक्रमातून पालिकेने या भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना पालिकेत ११ नगर सेवक असतानाही खोतकर यांच्या नावावर फुली मारून आमदार गोरंट्याल यांनी डावल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा विरुद्ध शिवसेना असा वाद असल्याचे समोर येते आहे. आजच्या कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते एकत्र आल्याने आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. 

जालना नगर पालिकेवर सध्यातरी काँग्रेस चे विद्यमान आमदार कैलाश गोरंट्याल यांची एक हाती सत्ता आहे.  या पालिकेत कॉंग्रेस २८, भाजपाचे ११, शिवसेनेचे ११, राष्ट्रवादीचे ९, अपक्ष २ असे संख्या बळ आहे. काँग्रेसच्या सौ.संगीता गोरंट्याल नगर अध्यक्ष असलेल्या या नगर पालिकेला आघाडी सरकार मधील नगर विकास मंत्री आपल्या प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांना निधी देतात, मात्र सत्तेत असून ही नगर पालिकेला  निधी देत नसल्याचा आरोप करत आघाडी सरकार विरुद्ध उपोषण करण्याचा पावित्रा आमदार गोरंट्याल यांनी घेतला होता. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com