मोदींच्या नावावर मते मिळण्याची गॅरंटी नाही! केंद्रीय मंत्र्याने टाकला बॉम्ब

केंद्रीय मंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे विधान केले असून, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मोदींच्या नावावर मते मिळण्याची गॅरंटी नाही! केंद्रीय मंत्र्याने टाकला बॉम्ब
Narendra Modi and Rao Inderjit Singh File Photo

नवी दिल्ली : केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नावावर निवडणुका जिंकता येणार नाहीत, असा बॉम्ब केंद्रीय मंत्री राव इंदरजितसिंह (Rao Inderjit Singh) यांनी टाकला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी हरियानात भाजप (BJP) कार्यकर्त्यांच्या बैठकीत हे विधान केले असून, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राव इंदरजितसिंह हे कंपनी व्यवहार व नियोजन खात्याचे राज्यमंत्री आहेत.

इंदरजितसिंह यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. आपल्या राज्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत. परंतु, त्यांच्या नावावर मते मिळण्याची कोणतीही गॅरंटी नाही. मोदींच्या नावावर मतदारांनी आपल्याला मते द्यावीत, असा आपला हेतून असायला हवा. परंतु, तळागाळात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर हे अवलंबून आहे. त्यांनी मतदार मोदींच्या नावावर मतदान करतील, यासाठी प्रयत्न करावेत.

भाजपला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला होता. याचा संदर्भ देऊन इंदरजितसिंह म्हणाले की, मोदीजींमुळे आपण केंद्रात सत्ता स्थापन करू शकलो, हे मला मान्य आहे. याचा परिणाम त्यावेळी राज्यांमध्येही झाला. हरियानात पहिल्यांदा आपण बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. परंतु, दुसऱ्या वेळी हे घडले पण त्यासाठी दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा घ्यावा लागला.

Narendra Modi and Rao Inderjit Singh
काँग्रेस नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीच्या चर्चेवर येडियुरप्पांनी मौन सोडलं अन् म्हणाले...

भाजपला हरियानात पहिल्यांदा 90 पैकी 47 जागा मिळाल्या होत्या. दुसऱ्या वेळी भाजपला 40 जागा मिळाल्या होत्या. यामुळे भाजपला जननायक जनता पार्टीबरोबर युती करावी लागली होती. यावर इंदरजितसिंह म्हणाले की, आता आपण 45 जागा टिकवू शकणार आहोत का, हा मूळ प्रश्न आहे. याबाबत आपण विचार करायला हवा.

Narendra Modi and Rao Inderjit Singh
सिद्धरामय्यांचे कुमारस्वामींना आव्हान...तर मी राजकारणातून संन्यास घेईन

हरियानात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे सरकार हॅटट्रिक करण्याचे नियोजन करीत आहे. परंतु, मागील वर्षापासून सरकार अनेक वादग्रस्त मुद्द्यांमध्ये अडकले आहे. यातील मुख्य मुद्दा हा केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा आहे. हरियानातील शेतकऱ्यांचा या कायद्यांना मोठा विरोध आहे. याचा फटका खट्टर सरकारला आगामी निवडणुकांत होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.