केंद्रीय मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना डच्चू; एकूण 43 मंत्री आज घेणार शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
ramesh pokhriyal santosh gangwar and debshree chuadhary dropped from union cabinet
ramesh pokhriyal santosh gangwar and debshree chuadhary dropped from union cabinet

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. या तिघांनी मंत्रिपदाची राजीनामा दिला आहे. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्तारासाठी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत सुमारे 43 मंत्री आज शपथ घेतील. ही बैठक सुरू असतानाचा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी या तिघांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी या मंत्रिमंडळ विस्तारासाठी चतु:सूत्री ठरवली आहे. यात पहिला मुद्दा म्हणजे ओबीसींना जादा प्रतिनिधित्व देणे. दुसरा मुद्दा चांगला प्रशासकीय अनुभव असलेल्या राज्यांतील नेत्यांना केंद्रात आणणे. तिसरा मुद्दा एकूणच मंत्रिमंडळाचे सरासरी वय कमी करणे आणि चौथा मुद्दा व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या तज्ञ व्यक्तींना संधी देणे. या चार मुद्द्यांवर आजचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

सध्या मंत्रिमंडळातील मागास समाजातील प्रतिनिधींची संख्या बाराच्या आसपास आहे. ओबीसींनी जादा प्रतिनिधित्व आणि इतर छोट्या समाजघटकांना स्थान देऊन ही संख्या 25 पर्यंत नेण्याचा प्रयत्न राहील. देशभरातील ओबीसींनी भाजपकडे ओढून घेण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात झुकते माप देण्याची खेळी खेळण्यात येईल. याचबरोबर उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ब्राह्मण समाजाचेही प्रतिनिधित्व वाढवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

केंद्रीय मंत्रिमंडळात 81 मंत्री असू शकतात परंतु, सध्या ही संख्या 53 आहे. यामुळे 28 नवीन सदस्यांचा समावेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी मंत्रिमंडळातील सदस्यांना गटाने बोलावून त्यांच्याशी चर्चाही केली होती. विस्तारात प्रादेशिक आणि जातीय समतोल राखला जाणार आहे. याचबरोबर पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकात डोळ्यामसोर ठेवून विस्तार केला जाईल. तसेच, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांना जादा प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com