भाजपचे आमदार म्हणतात, "आंधळ दळतयं.. कुत्रं पीठ खातयं.."   - Ram Satpute criticizes the government | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे आमदार म्हणतात, "आंधळ दळतयं.. कुत्रं पीठ खातयं.."  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

राम सातपुते यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली होती. आजही त्यांनी ट्विट करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पुणे : "आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं.." अशी गत राज्य सरकारची झाली आहे, " अशी टिका भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केली आहे. राम सातपुते यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारच्या धोरणावर टिका केली होती. आजही त्यांनी ट्विट करत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

सातपुते म्हणाले, "दुधाला दर मिळावा, म्हणून एल्गार आंदोलन केले पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. आज जी दुधाची अवस्था आहे. तीच अवस्था शेतीमालाची आहे. शेतकरी योग्य दर मिळत नाही म्हणून देशोधडीला लागला आहे."

आमदार सातपुते यांनी जे ट्विट केले आहे त्यामध्ये, "महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण तड़फडतोय. ख़ासगी हॉस्पिटलवाले लूटत आहेत. शेतकरी यूरिया साठी भटकतोय. दुधाला भाव नाही. शिक्षण संस्थानी विद्यार्थ्याला शुल्क भरायला तगादा लावलाय. शेतकरी, विद्यार्थी सामान्य नागरिक त्रस्त झालाय. आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी गत आहे," असे म्हटले आहे.

संबंधित लेख