उत्तर प्रदेशचा कोरोनावर अभूतपूर्व विजय; महाराष्ट्राने अनुकरण करावे! - Ram Naik criticize Maharashtra Government over corona cases | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

उत्तर प्रदेशचा कोरोनावर अभूतपूर्व विजय; महाराष्ट्राने अनुकरण करावे!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

उत्तर प्रदेशात 75 जिल्हे असून त्यापैकी सात जिल्हे कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. 41 जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची नवीन रुग्ण आलेले नाही.

मुंबई : उत्तर प्रदेश सरकार कोरोनावर अभूतपूर्व विजय मिळवला आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने जनतेला कोरोनामुक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशाचे अनुकरण करावे, असे आवाहन माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले आहे. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राची तुलना करणारी आकडेवारीच मांडली आहे. (Ram Naik criticize Maharashtra Government over corona cases)

राम नाईक हे उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशातील कोरोना योद्धे आणि उत्तर प्रदेशाची जनता यांचे अभिनंदन त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारला अनुकरण करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच 'मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रशंसनीय कामगिरी केली असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे,' अशा प्रकारच्या बातम्या येत असल्यामुळे जनतेला वस्तुस्थिती कळावे, यासाठी ही माहिती दिल्याचे नाईक यांनी सांगितले. 

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग अन् वनमंत्री अडचणीत

केंद्र सरकारकडून 19 जुलै रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाईक यांनी तुलनात्मक माहिती दिली आहे. त्यामध्ये भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेश व महाराष्ट्राच्या लोकसंख्येची तुलना करण्यात आली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 9 कोटी 70 लाख तर उत्तर प्रदेशची 16 कोटी 60 लाख असून ही संख्या 6 कोटी 90 लाखाने अधिक आहे. त्यातुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या उत्तर प्रदेशपेक्षा 14.47 टक्क्यांनी अधिक आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली आहे. 

देशात कोरोना संक्रमणाची सक्रीय संख्या 4 लाखांहून अधिक असून महाराष्ट्रातील आकडा सुमारे 99 हजार एवढा आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ 1200 सक्रीय रुग्ण आहेत. मृतांच्या संख्येतही महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेशापेक्षा 1 लाखाने जास्त (25.18 टक्के) आहे. महाराष्ट्रात चार कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा 11 लाखांहून अधिक डोस दिले गेले आहेत, असेही नाईक यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशात 75 जिल्हे असून त्यापैकी सात जिल्हे कोरोना संक्रमणापासून मुक्त झाले आहेत. 41 जिल्ह्यात कोरोना संक्रमणाची नवीन रुग्ण आलेले नाही. तर 34 जिल्ह्यात नवीन रुग्ण 10 पेक्षा कमी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनावर जवळजवळ पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा ‘जनता दर्शन’ कार्यक्रम 13 जुलैपासून सुरू केला आहे. असा नागरिकांना भेटण्याचा कार्यक्रम उद्धव ठाकरे करत नाहीत, अशी टीकाही नाईक यांनी केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख