राम मंदिरासाठी कोटींची कोटी उड्डाणे...खर्चाच्या तब्बल दीडपट रक्कम जमा

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी जमा करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. याला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
ram mandir trust received two thousand crore rupees donations
ram mandir trust received two thousand crore rupees donations

नवी दिल्ली : अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी  मोहीम राबवण्यात आली. या मंदिरासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे. असे असताना विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत खर्चाच्या दीडपट जास्त म्हणजे २ हजार १०० कोटी रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. 

राम मंदिरासाठी अकराशे कोटी रुपांचा खर्च होईल, असा सुरवातीला अंदाज होता. नंतर हा अंदाज वाढून दीड हजार कोटी रुपयांवर गेला. प्रस्तावित मंदिराच्या पायासाठी नवी रचना केल्यामुळे हे चारशे कोटी रुपये वाढल्याचे सांगण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे महासचिव चंपत राय यांच्या माहितीनुसार हा खर्च आणखीही वाढू शकतो. 

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी यावर्षी संक्रांतीपासून देशभरात देणगी संकलनाची मोहीम सुरू केली आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील कार्यकर्त्यांनी पाच लाख गावांत जाऊन देणग्या जमा केल्या आहेत. या मोहिमेची सांगता झाली असून, त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या माहितीनुसार मंदिरासाठी २ हजार १०० कोटी रुपये जमा झाले आहेत. समर्पण निधीच्या १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या ४४ दिवसांच्या कालावधीती देशविदेशातील कोट्यवधी लोकांनी देणग्या दिल्या. 

याबाबत श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज म्हणाले की, अनेक लोकांनी देणग्या देऊ केल्या आहेत. मात्र आता खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने त्या स्वीकारायच्या की नाही याचा निर्णय जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. विदेशातील भारतीयांकडून देणगी देण्याबाबत अजूनही विचारणा होत आहे. यासाठी विहिंपने बँक खाते उघडले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com