संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भाजपचे ठरेना : तिसऱ्या जागेसाठी हुकमाचे पत्ते!

राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंचे काय होणार, याची उत्सुकता...
Dhananajay Mahadik-Harshwardhan Patil
Dhananajay Mahadik-Harshwardhan PatilSarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या चर्चेने सध्या राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही. या निवडणुकीत भाजपच्या दोन जागा हमखास निवडून येऊ शकतात. तिसऱ्या जागेसाठी पक्षाने हुकूमाचे पत्ते काढण्याची रणनीती आखली आहे.

या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा कोटा हा 42 ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडे दोन जागांच्या विजयासाठी तेवढी बेगमी आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल, (Piyush Goyal) विनोद तावडे, (Vinod Tawde) हर्षवर्धन पाटील, (Harshwardhan Patil) धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या नावाची चर्चा सध्या चर्चा सुरू आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडतात. भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. यात भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे पक्षाला जागा १३ मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार भाजप दोन, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात.

Dhananajay Mahadik-Harshwardhan Patil
छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा धक्का : शिवसेना सहावा उमेदवार देणार

पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांची खासदारकी निश्चित मानण्यात येत आहे. विकास महात्मे हे दुसरे खासदार निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर विनोद तावडे, विजया रहाटकर अशी नावे चर्चेत आहे. तिसऱ्या जागेसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील किंवा माजी खासदार धनंजय महाडिक यांना संधी मिळ शकते, अशी चर्चा आहे.

अर्थात खासदार संभाजीराजे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, यावर हा सारा निर्णय ठरणार आहे. संभाजीराजे हे प्रामुख्याने भाजपच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण भाजपकडे स्वतःची 22 मते अतिरिक्त आहेत. अपक्ष व इतर मते गृहित घरली तर हा आकडा वाढू शकतो.

Dhananajay Mahadik-Harshwardhan Patil
`वैशाली नागवडेंना लगावलेली थप्पड भाजपला महागात पडणार`

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रत्येकी एक या प्रमाणे तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. चौथी जागा शिवसेनेला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही ही चौथी जागा लढविणार असल्याचे सांगत संभाजीराजे आमच्याकडे आले तर त्यांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संभाजीराजेंना भाजप पाठिंबा देणारी की नाही, हा आता महत्वाचा प्रश्न आहे. समजा पाठिंबा दिला नाही तर भाजपचा तिसरा उमेदवार कोण, याचीही उत्सुकता राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com