निती आयोगात काम करणारे लोक उंटावरचे शहाणे.. - Raju Shetty lamented the recommendations made by the Policy Commission on sugarcane cultivation | Politics Marathi News - Sarkarnama

निती आयोगात काम करणारे लोक उंटावरचे शहाणे..

संपत मोरे
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

"निती आयोगात काम करणारे लोक उंटावरचे शहाणे आहेत. त्यांनी केलेल्या शिफारशी म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे.

पुणे : "शेतकरी ऊसाकडेच का वळतोय याचा विचार नितीआयोगाने करायला हवा. त्यांनी केंद्राला केलेल्या शिफारशी या उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. वजन कमी करायचे म्हणून कोणी आपले हात पाय तोडून टाकते काय?" असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. निती आयोगाने केंद्र सरकारला ऊस पिकाबाबत केलेल्या शिफारशीबद्दल राजू शेट्टी यांनी चीड व्यक्त केली आहे.

"निती आयोगात काम करणारे लोक उंटावरचे शहाणे आहेत. त्यांनी केलेल्या शिफारशी म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. त्यांनी ऊस पिकाला सहा हजार रुपये अनुदान देण्याची शिफारस केली आहे. तसेच साखर कारखान्यांनी 85 टक्केच ऊस घ्यावा, असे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या शिफारशी अव्यवहार्य आहेत. त्या चुकीच्या आहेत. शेतकऱ्यांना मारक ठरणाऱ्या आहेत," असे शेट्टी म्हणाले.

"आमचा शेतकरी ऊस पिकाकडे का वळत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. इतर पिकांना हमीभाव मिळत असता तर तो ऊसाकडे वळला असता का? असा सवाल करून शेट्टी म्हणाले, "इतर पीक आणि कडधान्य याला हमीभाव मिळत नाही म्हणून शेतकरी ऊसाकडे वळतो आहे."

"एखाद्याच वजन कमी करायचे असेल तर त्याचे हात आणि पाय तोडण्याचा सल्ला द्यावा, असा हा निती आयोगाचा सल्ला आहे. उंटावरून  शेळ्या हाकण्याचा हा प्रकार आहे. शेतकरी ऊसाकडे का वळत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. इतर पिकांना हमीभाव मिळत असता तर तो ऊसाकडे वळला असता का ? हे आयोगाच्या लक्षात येत नाही काय ? असे शेट्टींनी म्हटले आहे.
 Edited  by : Mangesh Mahale   

हेही वाचा : योगी आदित्यनाथ प्रथम ; उद्धव ठाकरे 'या' क्रमांकावर 
 

मुंबई :  देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवे स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. योगींनी सलग तिसऱ्यांदा सर्वोच्च स्थान मिळविले आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. एका सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्या; तर उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता वाढत आहे. कोरोनाच्या संकटात उद्धव ठाकरे यांनी मोठ्या धैर्याने सामना केला. देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईट्‌सने (मूड ऑफ द नेशन सर्व्हे) केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख