मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार झाला पण महत्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच!

मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी मुख्यमंत्र्यांनी गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत.
मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार झाला पण महत्वाची खाती मुख्यमंत्र्यांकडेच!
Rajasthan Cabinet Ministers after the swearing-in ceremony. Sarkarnama

जयपूर : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात समेट झाल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मोठा गाजावाजा करीत मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Reshuffle) झाला असला तरी मुख्यमंत्री गेहलोतांनी गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. यामुळे पुन्हा एकदा सरकारवर आपलीच पकड कायम राहील, अशी खेळी गेहलोतांनी खेळल्याचे समोर आले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात 15 नवीन चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. यात पायलट समर्थक 5 मंत्र्यांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चार दलित, 3 आदिवासी, 3 महिला आणि अल्पसंख्याक समाजातील एकाला मंत्रिपद देण्यात आले आहे. विस्तारानंतर गेहलोत यांनी 24 तासांतच खातेवाटप जाहीर केले आहे. यात त्यांनी गृह व अर्थ ही महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत.

Rajasthan Cabinet Ministers after the swearing-in ceremony.
सर्वांना बूस्टर डोस अन् लहान मुलांनाही कोरोना लस; सरकारचा मोठा निर्णय

बी.डी.कल्ला यांनी शिक्षण खाते तर प्रसादीलाल मीणा यांना आरोग्य खाते देण्यात आले आहे. प्रमोद जैन भाया यांच्याकडील खाण व पेट्रोलियम खाते कायम ठेवण्यात आले आहे. लालचंद कटारिया यांच्याकडे कृषी तर उदयलाल अंजाना यांच्याकडे सहकार खात्याची धुरा देण्यात आली आहे. शांती धारिवाल यांच्याकडील संसदीय कामकाज खाते कायम राहिले असून, मंत्रालय कामकाज खाते सालेह मोहम्मद यांच्याकडे गेले आहे. विश्वेंद्रसिंह यांना मागील वर्षी मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता त्यांना पुन्हा पर्यटन खाते तर रमेश मीणा यांना पंचायत राज खाते देण्यात आले आहे. ब्रजेंद्र ओला यांना रस्ते वाहतूक, भजन लाल जाटव यांना सार्वजनिक बांधकाम आणि शकुंतला रावत यांना उद्योग खाते देण्यात आले आहे.

Rajasthan Cabinet Ministers after the swearing-in ceremony.
चंद्राबाबू रडले अन् बालकृष्ण, ज्युनिअर एनटीआर संतापले!

मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in