संसदेचं पावसाळी अधिवेशन यंदा प्रश्नसत्राविना... - Rainy session of Parliament without question session | Politics Marathi News - Sarkarnama

संसदेचं पावसाळी अधिवेशन यंदा प्रश्नसत्राविना...

वृत्तसंस्था
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

खासदारांना सभागृहात मास्क लावून बसणे अनिवार्य आहे. तसेच भाषण करताना मास्क लावणे गरजेचे आहे. 

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन ता. 14 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजात काही बदल करण्यात आले आहे. यंदा अधिवेशनात प्रश्नसत्र होणार नसल्याचे संसदेच्या प्रशासकीय यंत्रणेने सांगितलं आहे. ता. 1 ऑक्टोबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनात उपस्थित राहण्यापूर्वी खासदारांची कोरोना चाचणी होणार आहे. खासदारांना सभागृहात मास्क लावून बसणे अनिवार्य आहे. तसेच भाषण करताना मास्क लावणे गरजेचे आहे. 

ता. 14 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता लोकसभेची बैठक सुरू होणार आहे. अन्य दिवशी दुपारी तीन ते सांयकाळी सात वाजेपर्यंत ही बैठक असणार आहे. याचप्रमाणे राज्यसभेची बैठक पहिल्या दिवशी (ता. 14 सप्टेंबर) दुपारी तीन सांयकाळी सातपर्यंत असेल. तर अन्य दिवशी सकाळी नऊ ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही बैठक असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून ही बैठक होणार आहे. यासाठी बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, यासाठी सर्व दालन आणि गॅलरीमध्येही बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. 
   

हेही वाचा : तर गुलाम नबी आझाद आणि सिब्बलांचे भाजपमध्ये स्वागत करु :  आठवले

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद आणि कपील सिब्बल यांनी काँग्रेसच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. जर राहुल गांधी त्यांच्यावर आरोप करत असतील तर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस सोडावी, आम्ही भाजपमध्ये त्यांचे स्वागत करु, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. पुढील निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार आहे. जर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी करण्याचे आरोप काँग्रेसमधून होत असतील तर या दोन्ही नेत्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमाणे पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे योग्य ठरेल, असे आठवले म्हणाले. 
''काँग्रेस पक्षात अध्यक्षपदावरून वाद सुरु आहेत. अशाच पक्षाच्या उभारणीसाठी झटलेल्या नेत्यांवर आरोप होत असतील तर अशा नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणे योग्य ठरेल. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर सचीन पायलटही काँग्रेस सोडणार होते. पण नंतर त्यांनी समझोता केला,'' असेही आठवले म्हणाले. काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या वीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख