राहुल गांधी म्हणाले, "मोदी है तो मुमकिन है.." - Rahul Gandhi tweaked Modi | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी म्हणाले, "मोदी है तो मुमकिन है.."

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षाचीच घोषणा "मोदी है तो मुमकिन है," असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना चिमटा काढला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी हे देशातील आर्थिक धोरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही दिवसापासून निशाना साधत आहेत. आर्थिक धोरणावरून आजही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टिका केली आहे. भारतीय जनता पक्षाचीच घोषणा "मोदी है तो मुमकिन है," असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना चिमटा काढला आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती यांच्या विधानाचं दाखला राहुल गांधी यांनी दिला आहे. 

कोरानामुळे स्वातंत्र्यानंतर देशाचं राष्ट्रीय उत्पन सर्वात कमी झाले असल्याचे मत नुकतेच नारायण मूर्ती यांनी व्यक्त केलं आहे. याचं विधानावरून राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक धोरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर भाष्य केलं आहे. 

एका वेबिनारमध्ये बोलताना नारायणमूर्ती यांनी याबाबत मत केलं आहे. ते म्हणाले आहे की भारताच्या राष्ट्रीय उत्पत्न कमीत कमी 5 टक्के कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा झाली होती. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात पुन्हा पूर्णक्षमतेने काम करता येईल, असं नवीन धोरण देशानं राबविलं पाहिजे. कोरोनामुळे परदेशातील प्रवास बंद झाला आहे. जगभरातील व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे जगातील जीडीपी खूप कमी झाला आहे. अशा परिस्थितीत जगाचा जीडीपी 5 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.     
 

हेही वाचा :‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन ; आता तरी धडा घ्या.. 

मुंबई : "राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा," असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून राजस्थानमधील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर निशाना साधला आहे. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख