Rahul Gandhi and Abhishek banerjee pair will bring change
Rahul Gandhi and Abhishek banerjee pair will bring change

राहुल अन् अभिषेकची जोडी मोदी-शहांविरोधात परिवर्तन आणणार!

महिला काँग्रेसच्याअध्यक्षा सुश्मिता देव यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्येप्रवेश केला आहे.

नवी दिल्ली : महिला काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सुश्मिता देव (Sushmita Dev) यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. सुश्मिता देव यांनी त्यांचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे (Sonia Gandhi) पाठवला होता. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर सोनिया गांधींची माफीही मागितली होती. आता त्यांनी पुन्हा काँग्रेसचं कौतुक सुरू केलं आहे. (Rahul Gandhi and Abhishek banerjee pair will bring change)

तृणमूल प्रवेशानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुश्मिता देव काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि राहुल गांधी यांची जोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात परिवर्तन घडवतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.   

आसाम विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला देव यांच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देव यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. सुश्मिता देव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची आई बीथिका देव या आसाम येथील सिल्चर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

दरम्यान, देव यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. देव यांनी पक्ष सोडण्याबद्दल सिब्बल यांनी नेतृत्वाला जबाबदार धरले होते. सिब्बल यांनी म्हटले होते की, सुश्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे तरुण नेते बाहेर पडत असताना आमच्यासारख्या वृद्धांकडून पक्ष बळकटीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दोष दिला जात आहे. पक्ष अजूनही डोळे बंद ठेवूनच पुढे जात आहे.  

कपिल सिब्बल यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. त्यावेळी सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले होते. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात होते. सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. यातील सर्व नेते या मेजवानीला उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com