प्रदेशाध्यक्षांच्या हल्ल्याने बेजार झालेले मुख्यमंत्री थेट सोनिया गांधींच्या भेटीला

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतरहीमुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि राज्य सरकारवरील हल्लाबोल सुरुच ठेवला आहे.
punjab cm amarinder singh will meet congress president sonia gandhi
punjab cm amarinder singh will meet congress president sonia gandhi

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) हे आता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्या हल्ल्यांमुळे बेजार झाले आहेत. यामुळे मुख्यमंत्री थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे आज सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेणार आहेत. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती मिळाली असली तरी आपल्याच राज्य सरकारवर टीका करीत आहे. सरकारला सिद्धू हे वारंवार अडचणीत आणत असल्याने मुख्यमंत्री हे हैराण झाले आहेत. त्यांचा विरोध असतानाही पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष बनवल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत. यात सिद्धू यांच्या कारवाया वाढू लागल्याने त्यांनी थेट पक्ष नेतृत्वाकडे धाव घेतली आहे. 

अमरिंदरसिंग हे आज सोनिया गांधींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा करतील. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा असली तरी मुख्यमंत्री विस्तार करण्याच्या बाजूने नाहीत. नुकतीच त्यांनी विस्ताराची शक्यता फेटाळून लावली होती. पक्ष नेतृत्वाने मात्र विस्ताराचा आग्रह धरला आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

सिद्धू यांची नुकतीच पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  त्यांच्याबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत एकदिलाने काम करण्याचे जाहीर केले होते. परंतु, दिवसेंदिवस त्यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com