आता बास, अपमान सहन करणार नाही! मुख्यमंत्री अमरिंदरसिंगांनी पुकारले बंड

नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. आता अमरिंदरसिंग यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
punjab cm amarinder singh warns congress ledership
punjab cm amarinder singh warns congress ledership

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात उघड बंड पुकारले होते. त्यामुळे काँग्रेस (Congress) हाय कमांडने सिद्धूंना प्रदेशाध्यक्षपदी बढती दिली होती. आता मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. त्यांनी समर्थक आमदारांची मूठ बांधण्यास सुरवात केली आहे. ते पक्षाच्या विरोधात उघड बंड पुकारतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी चर्तेत त्यांनी सांगितले की, हा अपमान आता पुरेसा असून, हे तिसऱ्या वेळी घडत आहे.वारंवार पक्षात माझा अपमान सुरू असून, आता मी पक्षात राहू शकत नाही.

सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची बढती मिळताच त्यांनी पुन्हा आमदारांना हाताशी धरुन मुख्यमंत्र्यांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या. परंतु, काँग्रेस हाय कमांडने अमरिंदर हेच राज्यात कॅप्टन असतील, हे स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्या वादावर पडदा पडला होता. पण पुन्हा एकदा सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चा उघडला आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद निर्माण झाल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. आता यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com