मनसेच्या आंदोलनाला किंमत देत नाही : पुण्याच्या महापौरांचा टोला

कोरोनाच्या पाश्वभूमीवर साधेपणाने विशेषत: घरीच गणपतीचे विसर्जन करण्याचा आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले आहे. त्याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कचरा साठविण्याचे कंटेनर असल्याचा आरोप करीत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आंदोलन केले होते. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. त्याला महापौरांनी उत्तर दिले आहे
Pune Mayor Murlidhar Mohol answers MNS Leaders allegations
Pune Mayor Murlidhar Mohol answers MNS Leaders allegations

पुणे  : विसर्जनासाठी पुरविलेल्या फिरत्या हौदांसाठी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याचा मुद्दा उपस्थितीत करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आरोप महापौर मुरलीवर मोहोळांनी फेटाळून लावले आहेत. जगात कोणीच्या श्री गणेशाच्या विसर्जनासाठी कचऱ्याचे  कंटनेर वापरणार नाही; मात्र तसा समज जे पसरवत आहेत, अशा विघ्नसंतोषीं लोकांना आम्ही किमत देत नाही, अशा शब्दांत महापौर मोहोळ यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फटकारले आहे. 

गणेशोत्सवाआधीपासून चर्चेत राहिलेल्या विसर्जनाच्या मुद्यावरून आता राजकीय खडाखडी सुरु झाली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर साधेपणाने विशेषत: घरीच गणपतीचे विसर्जन करण्याचा आवाहन महापालिकेने पुणेकरांना केले आहे. त्याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी कचरा साठविण्याचे कंटेनर असल्याचा आरोप करीत मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आंदोलन केले होते. यासंदर्भात दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे

यावर आता महापौर मुरलीधर मोहोळही आक्रमक झाले आहेत. अशा वागण्यातून आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला त्यांनी मनसेच्या नेत्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी मनसेच्या नेत्यांवर आगपाखड केली आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, "पुणेकर साधेपणाने आणि अत्यंत संवमाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. त्यांना पुरविलेल्या सुविधांबाबत नागरिकांची तक्रार नाही. मात्र केवळ राजकीय भावनेतून विघ्न आणून वातावरण बिघडविण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जात आहेत. अशांना आम्ही जुमानत नाही,"

एकाबाजूला मनसेची भूमीका खोटी असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सांगत आहेत. त्याचवेळी फिरत्या हौदांसाठी वापरलेल्या यंत्रणेची चौकशी करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या प्रकरणातील दोषीवर कारवाईची मागणी मनसेने आयुक्तांकडे केली आहे.
Edited By - Amit Golwalkar 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com