महाविकास आघाडीला गोत्यात आणणाऱ्या परमबीर सिंहांना लवकरच मोठा धक्का

परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
Process initiated to issue a lookout notice against Parambir Singh
Process initiated to issue a lookout notice against Parambir Singh

ठाणे : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खंडणीप्रकरणात ठाण्यात त्यांच्यासह गँगस्टर रवी पुजारी, अन्य काही पोलिस अधिकारी अशा 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह इतर आरोपींविरूध्द लुकआऊट नोटीस काढण्याची तयारी सुरू केली आहे. (Process initiated to issue a lookout notice against Parambir Singh)

परमबीर सिंह यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्याविरोधात सीबीआय, ईडीची कारवाई सुरू झाली. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांच्याविरोधातही खंडणी, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

भाजपने परमबीर सिंह यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा डाव आखला होता, असा आरोप आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावर अनेकांनी खंडणीचे आरोप केले आहेत, त्याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाजपने चाल खेळली आहे. अधिकारी अडकले आहेत, त्यांना वाचवून मंत्र्यांविरोधात वापरण्याचे हे भाजपाचे  षडयंत्र आहे. परमबीर सिंह परदेशात पळून जाऊ नयेत, हे केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष ठेवावे, असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. 

या घडामोडींनतर महत्वाची बातमी समोर आली आहे. खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केल्याचे समजते. ठाणे पोलिसांनीच याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे कधीही ही नोटीस जारी केली जाऊ शकते. परिणामी, परमबीर सिंह अडचणीत येऊ शकतात. परदेशात पळून जाण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींविरोधात ही नोटीस बजावली जाते. परमबीर सिंह यांच्याविरूध्द ही नोटीस जारी केल्यास अशी नोटीस बजावलेले ते शासन सेवेत असलेले पहिले अधिकारी ठरतील. 

लुकआऊट नोटीस म्हणजे काय?

कुख्यात गुन्हेगार, एखाद्या गुन्ह्यातील आरोपी किंवा गुन्ह्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीविरोधा लुकआऊट नोटीस जारी केली जाते. तपास यंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले जाते, तेव्हा संबंधित व्यक्तीकडून यंत्रणांना सहकार्य मिळत नाही आणि संबंधित व्यक्ती परदेशात पळून जाण्याची शक्यता असेल तेव्हा त्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली जाते. संबंधित व्यक्तीला देशाबाहेर जाण्यापासून रोखणे हा या नोटिशीचा उद्देश असतो. या नोटिशीच्या आधारे संबंधित व्यक्तीला कोणत्याही मार्गाने परदेशात प्रवास करण्यापासून रोखले जाते. 

दरम्यान, केतन तन्ना यांच्यासह सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी (Ravi Pujari) हासुद्धा आरोपी आहे. परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे पोलिसांनी तिघांचा 30 जुलैला जवाब नोंदवून परमबीरसिंह यांच्यासह २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

यामध्ये आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यामध्ये तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एसीपी एन. टी. कदम, तसेच दोन पोलीस शिपायांच्या समवेश आहे. तसेच गँगस्टर रवी पुजारी याचेदेखील नाव यात आहे. त्यांच्या विरोधात जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारख्या दहांहून अधिक कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com