नवीन वर्षांत मोदींच्या 'मन की बात'चा नवीन विक्रम; जाणून घ्या काय विक्रम... - prime minister narendra modi mann ki baat creates new record in new year | Politics Marathi News - Sarkarnama

नवीन वर्षांत मोदींच्या 'मन की बात'चा नवीन विक्रम; जाणून घ्या काय विक्रम...

वृत्तसंस्था
रविवार, 31 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात;च्या माध्यमातून नवीन वर्षांत प्रथमच आज देशवासियांशी संवाद साधला. या 'मन की बात'नेही विक्रमी कामगिरी केली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला उद्देशून 'मन की बात' केली. हा या वर्षातील पहिलाच कार्यक्रम होता. याआधीच्या काही 'मन की बात' कार्यक्रमांना विक्रमी डिसलाईक्स आल्याने भाजपच्या यूट्यूब चॅनेलवर लाईक्स आणि डिसलाईक्स दिसणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आता दूरदर्शन आणि पंतप्रधान कार्यालयाच्या या यूट्यूब चॅनेलवर 'लाईक्स'च्या तुलनेत विक्रमी डिसलाईक्स मिळाले आहेत. 

दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेवर पंतप्रधान मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमात भाष्य केलं. दिल्लीत २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला. असंही मोदी म्हणाले.  

आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधानांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत नागरिकांना आजचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्याचं आवाहन केलं होतं. 

भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाईक्स आणि डिसलाईक्स दिसत नसल्याने नेटिझन्सही 'मन की बात'चे प्रसारण झालेल्या 'दूरदर्शन नॅशनल' व 'डीडी न्यूज' आणि पंतप्रधान कार्यालयाच्या 'पीएमओ इंडिया' या यूट्यूब चॅनेलकडे मोर्चा वळवला. 

'दूरदर्शन नॅशनल' यूट्यूब चॅनेलवर सुमारे 2 लाख 70 हजार जणांनी हा कार्यक्रम पाहिला. या  चॅनेलवर  14 हजार लाईक्स तर 26 हजार डिसलाईक्स मिळाले आहेत. 'डीडी न्यूज'वर 42 हजार 660 जणांनी हा कार्यक्रम पाहिला. याला यूट्यूबवर 1.4 हजार लाईक्स तर पाचपट म्हणजेच 7.4 हजार डिसलाईक्स मिळाले आहेत.  'पीएमओ इंडिया'वर या कार्यक्रमाला 3.6 हजार लाईक्स मिळाले असून, जवळपास दुप्पट म्हणजेच 7.1 हजार डिसलाईक्स मिळाले आहे. या चॅनेलवर सुमारे 50 हजारहून अधिक जणांनी हा कार्यक्रम पाहिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख