पंतप्रधान मोदींनी राणेंवर टाकली आणखी एक मोठी जबाबदारी - prime minister narendra modi appointed narayan rane in cabinet committee | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान मोदींनी राणेंवर टाकली आणखी एक मोठी जबाबदारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जुलै 2021

नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे. आता राणेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक मोठी जबाबदारी टाकली आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार नुकताच झाला. या विस्तारात महाराष्ट्रातील यात नारायण राणे (Narayan Rane) यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खाते देण्यात आले आहे. आता राणेंवर मोदींनी आणखी एक मोठी जबाबदारी टाकली आहे. गुंतवणूक आणि विकासविषयक मंत्रिगटावर (Cabinet Committee) राणेंची निवड करण्यात आली आहे. 

मोदींनी मंत्रिमंडळ फेररचना आणि विस्तारानंतर आज मंत्रिगटांची पुनर्रचना करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी या मंत्रिगटांच्या अध्यक्षांसह सदस्यांची निवड केली आहे. यात गुंतवणूक व विकासविषयक अतिशय महत्वाच्या मंत्रिगटात राणेंचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे या समितीचे अध्यक्ष असून, राणेंसोबत नागरी हवाई वाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समितीचे सदस्य आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील सुमारे डझनभर खासदार दिल्लीत दाखल झाले होते. यामुळे महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कुणाचा समावेश होणार याबद्दल मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अखेर नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. 

हेही वाचा : राहुल गांधींनी नकार दिल्याने शशी थरुर अन् मनीष तिवारी शर्यतीत 

महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव आघाडीवर होते. मराठा आरक्षण प्रश्नामुळे राणेंसारख्या मराठा चेहऱ्याला संधी दिली गेली. याचबरोबर शिवसेनेला रोखण्यासाठी त्यांना बळ देण्यात आले. राणेंना कॅबिनेट तर इतर तिघांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. आता राणेंवर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख