प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले..

शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) सकाळी छापा टाकला. त्यांच्या कार्यालयावरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. प्रताप सरनाईक यांचे घर माजीवाडा मधील दोस्तीमध्ये आहे आणि ऑफिस वर्तक नगरला पाम क्लबच्या बाजूच्या इमारती मध्ये आहे. कुठल्या प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे, याची माहिती अजून समजलेली नाही.
Pratap Sarnaik Son arrested by Ed news
Pratap Sarnaik Son arrested by Ed news

औरंगाबाद ः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालय आणि घरी ईडीने आज सकाळी धा़डी टाकत कारवाई केली. दहा ठिकाणी धाडसत्र आणि कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर थोड्यावेळा पुर्वी ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. विहंग यांना घेऊन ईडीचे अधिकारी रवाना झाले आहेत.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या पुर्वेश आणि विहंग या दोन मुलांच्या घर व कार्यालयावर देखील ईडीच्या पथकाने आज धाड टाकत सकाळीच कारवाई केली. या पथकाकडून अजूनही शोध मोहिम सुरू आहे. दरम्यान या धाडसत्रामुळे शिवसेनेचे नेते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजप व केंद्रातील मोदी सरकारवर टिका करायला सुरूवात केली आहे.

शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) सकाळी छापा टाकला. त्यांच्या कार्यालयावरही ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. प्रताप सरनाईक यांचे घर माजीवाडा मधील दोस्तीमध्ये आहे आणि ऑफिस वर्तक नगरला पाम क्लबच्या बाजूच्या इमारती मध्ये आहे. कुठल्या प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे, याची माहिती अजून समजलेली नाही.

प्रताप सरनाईक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आक्रमक झाले होते. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याची नोटीसही सरनाईक यांनीच दिली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार 10ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यातील प्रताप सारणाई घर, मुलांचं घर, ऑफिस ही ठिकाणे असल्याचे समजते. पैसे बाहेर पाठवल्या प्रकरणी ही छापमारी करण्यात आली. मुंबई , ठाणे परिसरात छापमारी केली आहे

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com