शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगितलं अन् त्याच दिवशी मुंडेंना अभय मिळालं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे.
prakash ambedkar slams ncp president sharad pawar over dhananjay munde controversy
prakash ambedkar slams ncp president sharad pawar over dhananjay munde controversy

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप मुंडेंच्यावर कोणतीही कारवाई करणे टाळले आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला या मुद्द्यावर लक्ष्य केले आहे. 

बलात्काराच्या  आरोपावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणी रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा  हिच्याशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी कारवाई करण्याचे टाळले असून, हा ब्लॅकमेलचा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.

याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवारांनी  ज्या दिवशी सांगितलं की हे गंभीर प्रकरण आहे त्याच दिवशी लोकांच्या लक्षात आलं की धनंजय मुंडे यांना अभय मिळालं. यात आता इतर पक्षांनी भूमिका घेऊन फार परिणाम होणार नाही. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच  निर्णय घेणं महत्वाचं आहे. 

रेणू शर्मा यांनी डी.एन. नगर पोलीस ठाण्याला 14 जानेवारीला भेट दिली होती. या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाब नोंदविला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी उपस्थित होते. आता रमेश त्रिपाठी यांनाच धमक्या येत असल्याने खळबळ उडाली आहे. 

रेणू शर्मा यांनी आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले  होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता. 

मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com