Politics of Sushant Singh Rajput case begins ... | Sarkarnama

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण सुरू... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करू नका, मुंबई पोलिस तपास करण्यास सक्षम आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, त्यांच्या हेतुबदल शंका वाटते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुरू असलेला तपासाबाबत अनेक प्रश्नांना राऊत यांनी उत्तरे दिली. 

संजय राऊत म्हणाले, "सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस तपास करीत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर याबाबत कुणाला संशय घ्यायचा आहे, टिका करायची आहे, त्यांनी ते करावे. पण मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका घेणे चुकीचं आहे. या प्रकरणी चाळीस दिवसानंतर पाटण्यात गुन्हा दाखल होतो. याचा तपास सीबीआयने करावा, यासाठी बिहार सरकारने केंद्रसरकारकडे तगादा लावला होता. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप केला. हा सारा घटनाक्रम पाहिलं तर लक्षात येईल की यामागील सूत्रधार कोण आहे. पडद्यामागून कोण हालचाली करीत आहेत, कोण पटकथा लिहित आहे, हे लवकरच समजेल. कुणाचे हात किती दगडाखाली आहे, हे आम्हाला माहित आहे. लवकरच काही प्रकरणाचा तपास सुरू होणार आहे. त्यामुळे या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल."

जगात मुंबई पोलिसांच्या कामाबाबत कैातुक होते. देशातील काही महत्वाचा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी यापूर्वी केला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केंद्राने मुंबई पोलिसांशी कुठलीही चर्चा न करता तपास सीबीआयकडे देणार असल्याचे सांगितले आहे. हा सर्व प्रकार गोंधळ निर्माण करणारा आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.

हेही वाचा : नारायण राणे म्हणाले, "पैसे कमविणे हा शिवसेनेचा धंदा.. "
 
सिंधुदुर्ग : "नानारला प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना आता समर्थन करताना पाहायला मिळतंय. पैसे कमविणे शिवसेनेचा धंदा आहे. काल काय बोलतील आणि आज काय बोलण्यामध्ये बदल करतील सांगू शकत नाही, पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करतात, 100 टक्के समर्थन आहे, स्थानिक जनता ज्या दिशेने जाईल त्याच दिशेने आम्ही जाऊ," असे खासदार नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. वैभव नाईक म्हणाले की नानार प्रकल्पाला आमचं कोणतंही समर्थन नाही, स्थानिक जनतेचा विरोध होता. लोकसभेच्या निवडणुकीतचं भाजप बरोबर युती झालेली आहे. हा पुन्हा प्रकल्प कोणताही असेन तर शिवसेना हाणून पाडेल नारायण राणे यांना शिवसेनेवर आरोप करण्याची सवय आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख