निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत - police will interrogate kerala bjp president k surendran | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 जून 2021

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत आले असून, निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. 
 

तिरूअनंतपुरम : केरळ (Kerala) विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) बहुमत मिळवून पुन्हा डाव्यांची सत्ता आली. परंतु, भाजपला (BJP) राज्यात खातेही खोलता आले नव्हते. भाजपची राज्यात असलेली एकमेव जागाही पक्षाने गमावली. यातच आता केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन (K.Surendran) अडचणीत आले आहेत. निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. 

केरळमध्ये विधानसभेच्या एकूण 140 जागांसाठी मतदान झाले. डाव्यांच्या लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने (एलडीएफ) 90 जागा मिळवून बहुमत मिळवले. काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 44 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या हाती असलेली एकमेव जागाही पक्षाने गमावली होती. याचवेळी एलडीएफमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा मिळवल्या होत्या. 

आता विधानसभा निवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याप्रकरणी सुरेंद्रन यांची चौकशी विशेष पथकाद्वारे करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात पोलीस त्यांची चौकशी करतील, अशी  शक्यता आहे. याप्रकरणी भाजपच्या आणखी काही नेत्यांचीही चौकशी होणार आहे.  दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आदिवासी नेते सी. के. जानू यांच्या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) साथ द्यावी, यासाठी त्यांना पैसे पुरविल्याचा आरोप सुरेंद्रन यांनी फेटाळला आहे. जानू यांना पैशाचे आमिष दाखविले नाही अथवा त्यांना पैसे दिलेले नाहीत. भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप होत असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करेल, असा दावा सुरेंद्रन यांनी केला.

हेही वाचा : उपेंद्र कुशवाह म्हणाले, आम्ही असं बोललो असतो तर आतापर्यंत...

विधानसभा निवडणुकीत सलग दसुऱ्यांचा विजय मिळवत केरळमध्ये डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे. केरळमधील डाव्यांचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. विजयन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रीपद मिळाले आहे. विजयन हे 76 वर्षांचे असून मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विजयन यांच्यासह 20 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली होती. 

विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व नवीन चेहरे आहेत. कम्युनिस्ट पक्षाने मागील मंत्रीमंडळातील एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या 20 जणांमध्ये डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश नाही. या मंत्रिमंडळात केवळ जेडीएसचे नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशिधरन यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख