नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; आता मुक्काम : बरॅक क्रमांक 12, आर्थर रोड कारागृह

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अखेर ब्रिटनच्या सरकारने परवानगी दिली आहे.
pnb fraud accused nirav modi extradition cleared by uk government
pnb fraud accused nirav modi extradition cleared by uk government

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी व हिरे व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी अखेर ब्रिटनच्या सरकारने परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी मोदीच्या प्रत्यार्पण आदेशावर आज स्वाक्षरी केली. त्यामुळे त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याला आर्थर रोड कारागृहातील बरॅक क्रमांक 12 मध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे. 

मोदीच्या प्रत्यार्पणाला ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मंजुरी देऊन हे प्रकरण गृह मंत्र्यांकडे पाठवले होते. आता गृह मंत्र्यांनी मोदीच्या प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. पीएनबीमधील 14 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात मोदी हा आरोपी आहे. मोदी हा हिरे व्यापारी असून, त्याची देश आणि विदेशात अनेक शोरुम होती. त्याला प्रत्यार्पण वॉरंटवर लंडनमधील मेट्रो स्थानकात 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने याआधी अनेकवेळा फेटाळले आहेत. 

मोदीसाठी आर्थर रोड कारागृहातील बरॅक क्रमांक 12 
आर्थर रोड कारागृहाच्या बरॅक क्रमांक १२ मध्ये मोदीला ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे. स्टार इंडियाचे माजी मुख्य कार्य़कारी अधिकारी पीटर मुखर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बरॅक क्रमांक 12 मध्येच ठेवण्यात आले होते. भारतातील तुरुंगाची स्थिती चांगली नसल्याचे नीरव मोदीकडून ब्रिटनच्या न्यायालयात सांगण्यात आले होते. मात्र, आर्थररोड कारागृह हे व्यवस्थित असल्याचे निरीक्षण ब्रिटिश न्यायालयाने नोंदवले होते.  मोदीला ठेवण्यात येणाऱ्या बरॅकचा व्हिडिओही ब्रिटनच्या न्यायालयाला दाखवण्यात आला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली होती. 

काय आहेत बरॅक क्रमांक 12 ची वैशिष्टे? 
बरॅक क्रमांक 12 मध्ये इतर बरॅकसारखी कैद्यांची गर्दी नसते. बरॅक क्रमांक 12 मध्ये दोन भाग असून एका भागात सहापैका जास्त कैद्यांना ठेवले जात नाही. बरॅकमध्ये  नैसगिक प्रकाश, मोकळी हवा आहे. या बरॅकमध्ये पाश्चात्य पद्धतीच्या अटॅच्ड बाथरूमची सुविधा आहे. येथे पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधाही आहेत. येथील कैद्यांना गादी, उशी, ब्लँकेट दिले जाते. त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था याठिकाणी आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी आठवड्यातून एकदा या परिसराची पाहणी करतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com