राणेंच्या हकालपट्टीसाठी पाठवलेल्या पत्राची मोदींकडून दहा मिनिटांत दखल! 

जनआशिर्वाद यात्रा महाड येथे पोहचल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे.
PMO forword letter of Vinayak Raut to Home Ministry
PMO forword letter of Vinayak Raut to Home Ministry

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. या प्रकरणात राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण त्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदाराकडून पत्र लिहिण्यात होतं. या पत्रात मोदींनी दहा मिनिटांत दखल घेतल्याचा दावा या खासदाराने केला आहे. (PMO forword letter of Vinayak Raut to Home Ministry)

जनआशिर्वाद यात्रा महाड येथे पोहचल्यानंतर राणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक न्यायालयानं त्यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तर उच्च न्यायालयानंही तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर राणे यांना अटक करण्यात आली आहे.

ही घडामोड सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याची माहिती दिली आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी वापरलेली भाषा अत्यंत निंदनीय आहे. राणेंसारख आपली मर्यादा विसरणारे केंद्रीय मंत्री अशा भाषेचा वापर करत असल्याने त्यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. अशी भाषा करणारे मंत्री समाजाला काय संदेश देणार आहेत. हा आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे. त्यामुळे राणे यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. 

या पत्राची पंतप्रधान मोदी यांनी दहा मिनिटांत दखल घेतल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या दहा मिनिटांत ह्या  पत्राची दखल घेतली. दुपारी त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला आणि मला सांगितलं पंतप्रधान बैठकीत व्यस्त आहेत. तुम्ही गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोला, तुमचं तक्रार पत्र मी अमित शाह यांच्याकडे पाठवलं आहे,' असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे.  मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करत असून भाजपने राणेंना अटक झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com