पंतप्रधान मोदी आज एकाच दिवशी पुण्यासह तीन शहरांच्या दौऱ्यावर...जाणून घ्या कारण... - pm narendra modi is on ahmedabad pune hyderabad tour today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान मोदी आज एकाच दिवशी पुण्यासह तीन शहरांच्या दौऱ्यावर...जाणून घ्या कारण...

वृत्तसंस्था
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद या तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. या तिन्ही शहरांच्या एकाच दिवशी दौरा करण्यामागे त्यांचे खास प्रयोजन आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यासह तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. एकाच दिवशी तीन शहरांचा दौऱ्या करण्यामागे मोदींचे कारणही खास आहे. कोरोनाशी लढण्यासाठी देशात विकसित करण्यात येणाऱ्या तीन लशींच्या प्रगतीचा आढावा ते आज घेणार आहेत. या ते पुण्यासह अहमदाबाद व हैदराबादचा दौरा करून संबंधित संस्थांचे प्रमुख आणि संशोधकांशी चर्चा करतील. 

पंतप्रधान आज सर्वप्रथम अहमदबादला जातील. ते सकाळी 9.30 वाजता झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी पोचतील. त्यानंतर ते झायडस कॅडिलातर्फे विकसित होणाऱ्या झायकोविड लशीच्या चाचण्यांचा आढावा घेतील. झायडल कॅडिलाच्या झायकोव्ही-डी या लशीची पहिली चाचणी पूर्ण झाली असून, दुसरी चाचणी सुरू आहे. 

अहमदाबादवरून मोदी दुपारी 12.30 वाजता पुणे विमानतळावर पोचतील. पुण्यात ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि ऑक्‍सफर्डच्या सहकार्याने या कंपनीतर्फे बनविण्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या प्रगतीचा आढावा घेतील. सीरममध्ये मोदी दुपारी 1 ते 2 या वेळेत असतील. याविषयी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले की, आम्हाला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे कळविण्यात आले आहे. ते सीरम इन्स्टिट्यूटला भेट देतील.  

त्यानंतर मोदी हैदराबादकडे रवाना होतील.  येथे भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेला भेट देतील. हा उद्योग आयसीएमआरच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही लस विकसित करत असून त्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या प्रगतिपथावर आहेत. हैदराबादची भेट संपल्यानंतर मोदी सायंकाळी दिल्लीला रवाना होतील. 

मोदींच्या या दौऱ्याविषयी पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे. कार्यालयाने म्हटले आहे की, कोरोनाशी लढ्यात देश आता निर्णायक टप्प्यावर पोचला आहे. पंतप्रधान मोदी कोरोनाशी लस विकसित करण्यात येत असलेल्या सुविधांना भेट देतील. तेथील संशोधकांशी ते लशीची प्रगती जाणून घेतील. याचबरोबर देशातील कोरोना लशीच्या प्रगतीचा आढावाही ते घेतील. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख