पावसाचा हाहाकार : पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा  - PM has announced an ex gratia after Raigad landslide-mr82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

पावसाचा हाहाकार : पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 जुलै 2021

मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे.

रायगड : मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. महाड तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळून (Raigad Landslide) सुमारे 38 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. (PM has announced an ex gratia after Raigad landslide-mr82) 

महाड तालुक्यातील तळई गावात (Talai Village)  तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जखमीला 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : पावसाने पिकाचे नुकसान झाले असल्यास हे करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करत राज्यातील पुरस्थितीची माहिती घेतली. 

दरम्यान, आठवड्याभरापासून महाडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरुवारी ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई हे गाव डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 ते ४० घरे दबली गेली आहेत. दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी ढिगाऱ्याखालून 38 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर अजून 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या मुसळधार पाउस सुरु असल्यामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.

राज्यात मुसळधार पावसाने काल (गुरुवारी) हाहाकार माजवला. रायगड, चिपळूण, महाड आशा अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेकडो नागरिक पूरात अडकलेले आहेत. कित्येक भागांमध्ये दरडी कोसळल्याने मार्ग बंद झालेले आहेत. पूरात अडकेलेले नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून, प्रशासनाकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहे. आज (ता. २३ जूलै ) पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी रायगडमधील महाड येथे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. तर,पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस कंट्रोल रूमकडून मिळाली आहे. 

पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरड कोसळ्यामुळे आणि अनेक रस्ते पाण्यासाठी असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यास अडणी निर्माण होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र, काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे असे, आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख