ऑपरेशन कमळ : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्र्यांवरही होती पाळत

पेगॅससच्या संभावित लक्ष्य असलेल्या यादीत दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.
Phones Linked To Congress JDS Government Were On Pegasus List
Phones Linked To Congress JDS Government Were On Pegasus List

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) 2019 मध्ये काँग्रेस व जेडीएसचे सरकार पाडणे आणि भाजपचे सरकार आणण्यासाठी पेगॅसस स्पायवेअरचा वापर झाल्याचा दावा द वायर या वृत्तसंस्थेने केला आहे. या सरकारशी संबंधित काही नेत्यांचे मोबाईल क्रमांकही पेगॅससच्या संभाव्य लक्ष्य असलेल्या यादीत आहेत. (Phones Linked To Congress JDS Government Were On Pegasus List)

राजकारण्यांसह पत्रकार, उद्योजक व इतर काही व्यक्तींचे मोबाईल पेगॅसस स्पायवेअरद्वारे हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतात खळबळ उडाली आहे. पेगॅससच्या संभावित लक्ष्य असलेल्या यादीत दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचीही हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

सुरूवातीला भारतातील 40 पत्रकारांचे फोन हॅक केल्याची माहिती भारतातील एका वृत्तसंस्थेने दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर, तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी, अशोक लवासा, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी महिला यांच्यासह काही सुरक्षा यंत्रणांचे आजी-माजी प्रमुख, अधिकारी, काही उद्योजकांचाही त्यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आता कर्नाटकमधील जेडीएस व काँग्रेसच्या नेत्यांचे मोबाईल क्रमांकही या यादीत होते, असं द वायरने म्हटले आहे. 2019 मध्ये उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांचा मोबाईल क्रमांक तर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री सिदरामय्या यांच्या खासगी सचिवांचा मोबाईल क्रमांक या यादीत आहे. पण त्यांचे मोबाईल क्रमांक हॅक झाले होते किंवा नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. 2019 मध्ये जेडीएस व काँग्रेसचे आमदार फोडत भाजपने ऑपरेशन कमळ यशस्वी केलं होतं. जुलैमध्ये जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडून भाजप सत्तेत आले आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस प्रकरण बाहेर आल्याने केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. ही कंपनी केवळ सरकारलाच हे स्पायवेअर विकत देते. त्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. 

इस्राईलमधील ‘एनएसओ ग्रुप’ कंपनीने पेगॅसिस स्पायवेअर तयार केला आहे. पॅरिस येथील ‘फॉर्बिडन स्टोरीज’ आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थांनी ही बाब उघडकीस आणत ५० हजार मोबाईल क्रमांकाची यादीच तयार केली. ही माहिती त्यांनी जगभरातील इतर १६ वृत्तसंस्थांना  दिली. या यादीनुसार शोध घेतल्यानंतर ५० देशांमधील एक हजारांहून अधिक जणांवर पाळत ठेवल्याबाबतचे पुरावे मिळाले. ‘एनएसओ’ने ज्यांना हे स्पायवेअर विकले होते, त्यांच्याकडूनच पाळत ठेवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com