मोदी सरकारकडून दणका; घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला

चालू वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारकडून दणका; घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा महागला
LPG

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. बुधवार (ता. 6) देशभरात सिलिंडरच्या दरात पंधरा रुपयांनी वाढ करण्यात आली.

पेट्रोलियम कंपन्यांनी विना अंशदानित गॅस सिलिंडरचे दर 15 रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत एका सिलिंडरचे दर जवळपास 900 रुपयांवर पोहचले आहेत. एका सिलिंडरसाठी 899.50 रुपये मोजावे लागणार आहेत. पाच किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 502 रुपये द्यावे लागतील. मुंबईतही सिलिंडरचे हेच दर असतील. देशात एक सप्टेंबर रोजीच गॅस सिलिंडरचे दर 25 रुपयांनी वाढले होते. तसेच 17 ऑगस्ट रोजीही 25 रुपयांची दरवाढ करण्यात आली होती.

LPG
भाजपला धक्का; मुंडण करत आमदाराचा पक्षाला रामराम

देशात पेट्रोल आणि डिझेलच्यादरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. चालू वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले.

त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.