महागाईचा भडका...मुंबईत पेट्रोलने मारली सेंच्युरी!

कोरोना महामारीमुळे आधीच जनता त्रस्त झाली आहे. आता पेट्रोलआणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे.
petrol and diesel prices increased for 15 day in month of may
petrol and diesel prices increased for 15 day in month of may

नवी दिल्ली : कोरोना (Covid19) महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे. या महिन्यात 15 वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यात आले आहे. मुंबईत (Mumbai) आता पेट्रोलने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. इंधन दरवाढीचा (Fuel Prices) मोठा झटका सामान्य नागरिकांना बसत आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने देशातील आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे मागील काही काळ इंधन दरवाढ बंद होती. या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ पुन्हा सुरू झाली. या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही पंधरावी वाढ आहे. या महिन्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.54 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4.16 रुपये वाढ करण्यात आली आहे. 

आज पेट्रोलच्या दरात 19 पैसे तर डिझेलच्या दरात 29 पैसे वाढ करण्यात आली. फेब्रुवारीच्या मध्यात काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली होती. आता दरवाढ सुरू झाल्याने पेट्रोलने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईतही पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर आता 100.19 रुपये तर डिझेलचा दर 92.17 रुपये आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा दर सर्वाधिक आहे. तेथे पेट्रोलचा दर 104.94 रुपये आणि डिझेलचा दर 97.79 रुपये आहे. 

तेल कंपन्या या मागील 15 दिवसांतील खनिज तेलाचा दर आणि परकी चलन विनिमयाचा दर यांच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचा रोजचा दर निश्चित करतात. देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. 

मोदी सरकारने भरली झोळी 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com