ओळखपत्राशिवाय लाखो जणांनी घेतली लस; भारती पवारांचा लोकसभेत खुलासा

लसीकरणासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
Peoples can take corona vaccine without identity card says Dr Bharti Pawar
Peoples can take corona vaccine without identity card says Dr Bharti Pawar

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणासाठी ओळखपत्र बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. पण देशभरात आतापर्यंत तब्बल 3 लाख 83 हजार जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय लस देण्यात आल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत केला आहे.

लसीकरणासाठी कोविन पोर्टलच्या माध्यमातून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच थेट लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येते. पण तिथे गेल्यानंतर कोविन पोर्टल नोंदणी करूनच लस दिली जाते. त्यासाठी कोणतेही एक ओळखपत्र मागितले जाते. पण ओळखपत्राशिवायही लाखो जणांना लस देण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. भारती पवार यांनीच याबाबतची माहिती लोकसभेत दिली आहे. (Peoples can take corona vaccine without identity card says Dr Bharti Pawar)

आतापर्यंत देशभरातील ३ लाख ८३ हजार जणांना कोणत्याही ओळखपत्राशिवाय लस दिली आहे. हे लसीकरण २६ जुलै २०२१ अखेरपर्यंतचे आहे. ओळख नसलेल्या व्यक्तींनाही विशेष सत्रांद्वारे लस घेता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ओळखपत्र नसलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने कार्यपद्धती तयार केली आहे. तंत्रज्ञान उपलब्ध नसणाऱ्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावर एकट्याने किंवा समूहाने जाऊन नोंदणी करून लस घेता येऊ शकते. मोबाईल नसणाऱ्यांना कोविड-१९ ची १०७५ ही राष्ट्रीय हेल्पलाईन तसेच राज्याच्या हेल्पलाईनवरूनही नोंदणीचा पर्याय असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग फारसा झाला नाही. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालये सज्ज ठेवली जात आहे. तसेच काही कंपन्यांकडून लहान मुलांवर लशींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. काही देशांमध्ये यापूर्वीच लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.

भारतात ऑगस्ट महिन्यात लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, असे मांडविया यांनी बैठकीत स्पष्ट केलं आहे. संसर्गाची साखळी तोडण्याच्यादृष्टीने लहान मुलांचे लसीकरण महत्वाचे ठरणार आहे. तसेच लवकरात लवकर शाळा सुरू होण्यासाठीही हे पाऊल आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी सप्टेंबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल, असे सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com