पार्थ पवार म्हणाले....सत्यमेव जयते! सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयानंतर ट्विट - Parth Pawar Reaction on Sushant sinh Case SC Verdict | Politics Marathi News - Sarkarnama

पार्थ पवार म्हणाले....सत्यमेव जयते! सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयानंतर ट्विट

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी राममंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन्ही भूमीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमीकेशी विसंगत होत्या. त्यानंतर आपण पार्थच्या म्हणण्याला कवडीचीही किंमत देत नाही, पार्थ अपरिपक्व आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. 

पुणे : सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. हा निकाल येताच काही मिनिटांतच पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले आहे. गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असल्याचे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांनी हे ट्विट केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु होणार आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी राममंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. या दोन्ही भूमीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमीकेशी विसंगत होत्या. त्यानंतर आपण पार्थच्या म्हणण्याला कवडीचीही किंमत देत नाही, पार्थ अपरिपक्व आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही, असा सवाल भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केला आहे.

दुसरीकडे अभिनेता सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीने आपली अधिकृत बाजू वकिलांच्या माध्यमातून मांडली आहे. त्यात शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा आपला काहीही संबंध नसून, त्यांना कधीही भेटलेली नाही. त्यांच्याशी कधीही फोनवरून बोलणे झालेले नाही. केवळ ते शिवसेनेचे नेते आहे. इतकीच माहिती असल्याचे म्हटले आहे. रियाच्या वतीने तिचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी हे  स्टेटमेंट जारी करण्यात केले आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख