परमबीर सिंह यांचा पाय खोलात; बदली होताच घेतला सेकंड हँड आयफोन

एनआयएने या कटाशी संबंधित आरोपपत्र न्यायालायत दाखल केले आहे. मात्र यामध्ये परमबीर सिंह यांचे थेट नाव घेतलेले नाही.
Parambir Singhs involvement in the Explosives and Hiren murder case
Parambir Singhs involvement in the Explosives and Hiren murder case

मुंबई : प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या घराबाहेर कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या कटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) हाती महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. त्यामध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा थेट संबंध असल्याचे काही पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यामुळं परमबीर सिंह यांचा या कटाशी संबंध असल्याचे संशय अधिक गडद होत चालला आहे. (Parambir Singhs involvement in the Explosives and Hiren murder case)

एनआयएने या कटाशी संबंधित आरोपपत्र न्यायालायत दाखल केले आहे. मात्र यामध्ये परमबीर सिंह यांचे थेट नाव घेतलेले नाही. पण परमबीर सिंह यांच्यासंबंधित पुरावे या आरोपपत्रात जोडण्यात आले आहेत. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी सेकंड हँड आयफोन घेतल्याचे समोर आलं आहे. तसेच परमबीर सिंह हे या प्रकरणात अटक आरोपींशी फेसटाइम आयडी वापरून संपर्कात असल्याचाही संशय आहे. 

'फेसटाइम' आयडीचे पहिले नाव कुरकुरे आणि आडनाव बालाजी होते. तपासादरम्यान एनआयएला 'फेसटाइम' चालवण्यासाठी वापरली गेली गुगल खात्याबद्दलची माहिती मिळाली आहे. त्याच 'फेसटाइम' आयडीचा वापर आरोपींशी संवाद साधण्यासाठी केला जात होता. हे सर्वण गुगल खात्याचा वापर करून  'फेसटाइम' चालवत असल्याचे एनआयच्या तपासात समोर आलं आहे.  ISE####@gmail.com हे खाते वापरले जात असल्याचंही स्पष्ट झालं आहे. खात्याशी कोणाचा फोन जोडलेला आहे, त्याचे नाव काय आहे, हे शोधण्यासाठी अॅपल कंपनीच्या कायदेशीर कंपनीशी संपर्क साधला असता महत्वाची माहिती समोर आली.

तपासात दोन व्यक्तींची नावे समोर आली असून त्यावरून परमबीर सिंह यांच्यावरील संशय आणखी बळावला आहे. या तपासादरम्यान एनआयएला आणखी एक संशयित ईमेल आयडी सापडला. याच ईमेल आयडीचा वापर आरोपी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करत असल्याचा एनआयएला संशय आहे. याच संशयाच्या आधारावर एनआयएने 8 जुलै रोजी अॅपल इंडिया कंपनीला याबाबत माहिती दिली.

अॅपलने 20 जुलै रोजी एनआयएला महत्वाची माहिती दिली. ज्या ईमेल आयडीबद्दल बोलले जात आहे त्याचे पहिले नाव 'कुरकुरे' आणि आडनाव 'बालाजी' आहे. हे वाचल्यानंतर एनआयएला परमबीरच्या जवळच्या एका अधिकाऱ्याने सांगतलेली माहिती खरी असल्याचे पटले. कुरकुरे आणि बालाजी याबाबत या अधिकाऱ्याने एनआयएला माहिती दिली आहे. या अधिकाऱ्याने p###@hotmail.com आणि p####@gmail.com या दोन ईमेल आयडीची माहिती जबाबात दिली होती. पण तपासात ise####@gmail.com  ज्याचा वापर आरोपीनी संपर्क साधण्यासाठी केला होता, असा संशय आहे. त्याच आधारावर परमबीर सिंह यांच्यावरील संशय वाढला आहे. मात्र, एनआयएकडे याबाबत ठोस पुरावे नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com