पाकचे पंतप्रधान इम्रान खान आनंदले अन् म्हणाले, अफगाणिस्तान गुलामगिरीतून मुक्त!

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली आहे. यावरुन जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
pakistan pm imran khan says afghanistan is free from slavery
pakistan pm imran khan says afghanistan is free from slavery

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. यावरुन जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान अखेर गुलामगिरीतून मुक्त झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

इम्रान खान म्हणाले की, अफगाणिस्तानची गुलामगिरीतून अखेर मुक्तता झाली आहे. तुम्ही आमची संस्कृती हिरावून घेऊन आम्हाला मानसिक गुलाम बनवत होतात. हे खऱ्याखुऱ्या गुलामगिरीपेक्षाही वाईट असते. सांस्कृतिक गुलामगिरीच्या शृंखला तोडणे अतिशय अवघड असते. अफगाणिस्तानमध्ये जे आता घडत आहे ते गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे काम सुरू आहे.  

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या घडामोडींमुळे जगभरातील अनेक देशांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. 

तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com