संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

संसद अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर होणारे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार आहे.
over 17 loksabha mps found covid19 positive on first day of session
over 17 loksabha mps found covid19 positive on first day of session

मुंबई : संसदेचे अधिवेशन आजपासून सुरु झाले असून, 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांची काल (ता.13) आणि आज कोरोना चाचणी करण्यात आली होती. लोकसभेतील तब्बल 17 खासदार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य यंत्रणांसह केंद्र सररकारचेही धाबे दणाणले आहेत. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी सर्व खासदारांची कोरोना चाचणी बंधनकार आहे. आता पहिल्याच दिवशी 17 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देशातही कोरोनाचा कहर वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे तब्बल 92 हजार 70 रुग्ण सापडले होते. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 48 लाखांवर पोचला आहे. देशात कोरोनामुळे मागील 24 तासांत 1 हजार 136 जणांचा बळी गेला आहे. एकूण बळींची संख्या 79 हजार 722 आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या खासदारांमध्ये मीनाक्षी लेखी, अनंत कुमारे हेगडे, परवेशसाहिब सिंग, सुखबीरसिंग, हनुमान बेनिवाल, सुकांता मुजुमदार, गोड्डेटी माधवी, प्रताप राव जाधव, जर्नादन सिंह, विद्युत बारान, प्रदान बारुआ, एन रेड्डप्पा, सेल्वम जी, प्रताप राव पाटील, राम शंकर कथेरिया, सत्यपालसिंह आमि रोडामल नागर यांचा समावेश आहे. 

दरम्यान, राज्यसभा उपसभापतिपदासाठी आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते हरिवंशसिंह यांना रिंगणात उतरवले आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय जनता दलाचे (जेडीयू) नेते मनोज झा यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेनेने काल मनोज झा यांना पाठिंबा दिला होता. आज आम आदमी पक्षानेही (आप) झा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यसभेतील सरकार आणि विरोधकांच्या नेमक्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीने येणार आहे.  

मनोज झा यांनी 11 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभा उपसभापतिपदासाठी ते विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर एनडीएचे उमेदवार हरिवंशसिंह यांचे आव्हान आहे. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजच निवडणूक होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com