Ahmednagar News: नगरमध्ये महाआघाडीचा डंका : 14 पैकी 7 बाजार समीतीवर वर्चस्व; भाजपच्या हाती फक्त तीन बाजार समित्या

Market Committee Election : अहमदनगर जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांनी आपले गड राखले...
Ahmednagar Market Committee Election
Ahmednagar Market Committee ElectionSarkarnama

Bazar Samiti Election : राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. त्यानंतर अनेक दिग्गजांनी आपला गड राखला. तर काहींना मात्र, पराभवाचा धक्का बसला. अहमदनगर जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांनी आपले गड राखले आहे.

यामध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार शंकरराव गडाख, आमदार नीलेश लंके, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी बाजार समित्यांच्या निवडणुकीत आपलं वर्चस्व राखलं आहे. तर अकोले, पाथर्डी आणि श्रीगोंदे बाजार समित्यांमध्ये सत्तांतर झाले आहे.

Ahmednagar Market Committee Election
Bazar Samiti Election: कर्जतनंतर जामखेडमध्येही समान जागा; मतदारांनी राम शिंदे-रोहित पवारांना अडकवले, पुढे काय?

पाथर्डी बाजार समितीवर आधी राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, आता आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील गटाने तेथे एकहाती सत्ता आणली आहे. तर श्रीगोंदे बाजार समितीत महाविकास आघाडीच्या गटाने 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार बबनराव पाचपुतेंना धक्का बसला आहे.

Ahmednagar Market Committee Election
Karjat Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांना समान जागा; सभापती कुणाचा होणार? सुजय विखेंचं मोठं भाष्य

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, राहुरी, श्रीगोंदे, संगमनेर या तालुक्यांतील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. तर नगर बाजार समितीवर भाजप-शिवसेनेच्या युतीने बहुमत मिळवले. तर पाथर्डी बाजार समितीत भाजपने सत्ता खेचून आणली आहे.

कर्जत आणि जामखेड बाजार समितीत भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. तर शेवगावमध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या गटाने वर्चस्व राखलं आहे. तर अकोले आणि नेवासे बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारत वर्चस्व राखलं.

Ahmednagar Market Committee Election
Jamkhed Bazar Samiti: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये पुन्हा काँटे की टक्कर; कर्जतप्रमाणेच जामखेडलाही मिळाल्या समसमान जागा..

राहता बाजार समितीत भाजपने निर्वीवाद वर्चस्व मिळवले. तसेच श्रीरामपूर आणि कोपरगावमध्ये स्थानिक आघाड्यांनी जास्त जागा मिळवल्या आहेत.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने 7, तर भाजप व शिवसेना (शिंदे गट) युतीला 3, तर कर्जत-जामखेडमध्ये समसमान जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षाला (संमिश्र) दोन बाजार समितीवर बहुमत मिळालं. त्यामुळे जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा डंका दिसून आला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com