जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत बार्टीने घेतला महत्वाचा निर्णय
BartiSarkarnama

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत बार्टीने घेतला महत्वाचा निर्णय

पडताळणीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत.

पुणे : राज्यात शैक्षणिक प्रवेशासाठी सध्या जात प्रमाणपत्र पडताळणी (Caste Certificate) आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थी-पालकांकडून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अर्ज करण्यात येत आहेत. पण जात पडताळणी समितीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीचा वेग सध्या मंदावला आहे. त्यामुळे अर्ज करण्यात अडचणी येत आहेत. सध्या केवळ ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करता येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पडताळणी करून मिळण्याबाबत संभ्रम आहे.

ऑनलाईन प्रमाणलीचा वेग मंदावल्याने आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन (Online) व ऑफलाईन (Offline) अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (Barti) घेतला आहे. राज्यात ता. 16 नोव्हेंबर पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, ऑनलाईन प्रणालीवरील ताण वाढल्याने वेग मंदावला आहे.

Barti
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच वादाची ठिणगी; आमदाराचा थेट प्रियांका गांधीवर निशाणा

त्यामुळे विविध जिल्हयांतून अर्जदार लोकप्रतिनिधी तसेच समिती कार्यालयाकडूनही ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीसाठी बार्टीकडे विनंती करण्यात आली होती. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून त्यासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची व जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची गरज असते. त्यामुळे अर्जदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने अर्ज भरता येणार असल्याचे बार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Barti
सरकारी कंपनीचं दातृत्व; मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्याला दिले तब्बल सोळा कोटी

बार्टीने दिलेल्या माहितीनुसार, ता. 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणासाठीच स्वीकारण्यात येतील. तसेच अशा सूचना सर्व जातपडताळणी समित्यांनाही बार्टीमार्फत 17 नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in