Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi

वाहनमालकांना दणका! जुन्या वाहनांच्या नोंदणीबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारने सुरू केली आहे.

नवी दिल्ली : जुनी वाहने (Old Vehilces) भंगारात काढण्याच्या (Vehicle Scrapping Policy) धोरणाची अंमलबजावणी केंद्र सरकारने सुरू केली आहे. आता 15 वर्षांपेक्षा जुन्या कारची नव्याने नोंदणी (Registration Renewal) करताना आठपट शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी एप्रिल 2022 पासून सुरू होणार आहे.

केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्रालयाने याबाबतचा आदेश काढला आहे. त्याची पुढील आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी होणार आहे. याचबरोबर 15 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांची नव्याने नोंदणी करतानाही आठपट शुल्क मोजावे लागेल. ट्रक आणि बसच्या फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करताना हे आठपट पैसे द्यावे लागतील. दरम्यान, दिल्ली आणि परिसरातील वाहनांना ही नियम लागू होणार नाही. कारण दिल्ली आणि परिसरात 10 वर्षांवरील डिझेल वाहने आणि 15 वर्षांवरील पेट्रोल वाहनांना पूर्णपणे बंदी आहे.

सध्या 15 वर्षांवरील कारच्या नोंदणी नूतनीकरणासाठी 600 रुपये शुल्क आहे. ते आता 5 हजार रुपये होणार आहे. दुचाकीच्या नोंदणी नूतनीकरणासाठीचे शुल्क 300 रुपयावरून 1 हजार रुपयांवर जाणार आहे. जुन्या बसच्या नोंदणी नूतनीकरणासाठीचे शुल्क 1 हजार 500 रुपयांवरून 12 हजार 500 रुपयांवर जाणार आहे. नूतनीकरणास विलंब केल्यास खासगी वाहनांसाठी दरमहा 300 रूपये आणि व्यावसायिक वाहनांसाठी दरमहा 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

Prime Minister Narendra Modi
हवाई दलप्रमुख म्हणाले, महिला अधिकाऱ्यानं सांगितलं तसं घडलंच नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणाची अंमलबजावणी नुकतीच झाली. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणांतर्गत अनफिट आणि प्रदूषण करणारी वाहने पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धतीने वापरातून रद्द केली जातील. ही वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. यात ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन्स आणि नोंदणीकृती वाहने भंगार सुविधा उभारल्या जातील.

Prime Minister Narendra Modi
...तर मी राजीनामा देतो! केंद्रीय मंत्र्याचे खुले आव्हान

काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी?

या धोरणात व्यावसायिक वाहनांसाठी वयोमर्यादा 15 वर्षे आणि छोट्या खासगी वाहनांसाठी 20 वर्षे आहे. या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहने स्क्रॅप होतील. 17 लाख मध्यम वाहनांचेही रिसायकलिंग होईल. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहने रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचे स्टील, इतर धातू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com