नवीन मुख्यमंत्र्यांचीही पडणार विकेट? सिद्धूंची मोहीम सुरू (व्हिडीओ व्हायरल)

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा चरणजितसिंग चन्नी यांनी हाती घेतली आहे. आता सिद्धू यांनी चन्नी यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
नवीन मुख्यमंत्र्यांचीही पडणार विकेट? सिद्धूंची मोहीम सुरू (व्हिडीओ व्हायरल)
Charanjit Singh Channi and Navjot Singh SidhuFile Photo

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली आहे. चन्नी यांच्या रुपाने पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे विकेट पडली होती. आता सिद्धू यांनी चन्नी यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने खळबळ उडाली आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लखीमपूर खीरीत केंद्रीय मंत्र्याचा मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेने देशभरात गदारोळ उडाला आहे. या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. झिराकपूर येथे पक्षाने मोर्चा काढला होता. या मोर्चाला मंत्री परगतसिंग, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुखविंदरसिंग डॅनी आणि सिद्धू उपस्थित होते. या आंदोलनात मुख्यमंत्री चन्नी हे सहभागी होणार होते. त्यांना या येण्यासाठी विलंब झाल्याने सिद्धू आणि इतर नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे.

या क्लिपमध्ये सिद्धू हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याने सिद्धू हे तक्रार करताना दिसत आहेत. परगतसिंग हे सिद्धू यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. चन्नी दोन मिनिटांत येतील, असे परगतसिंग म्हणत आहेत. सिद्धूंचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी डॅनी हे आंदोलन यशस्वी होणार असे सांगत आहेत. यावर सिद्धू म्हणतात की, कुठे आहे यश? त्यांनी भगवंत सिद्धूंच्या मुलाला नेतृत्व करू दिले नाही. मग त्यांना मी यश काय असते ते दाखवले असते. काँग्रेस ही पंजाबमध्ये मृतप्राय झाली आहे. चन्नी हे 2022 मध्ये राज्यात काँग्रेसला बुडवणार आहेत.

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा शपथविधी नुकताच झाला. चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सैनी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. चन्नी यांच्या रुपाने काँग्रेसला पंजाबमध्ये पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला आहे. जातीय समीकरणे पाहून राहुल गांधींनी दोन उपमुख्यमंत्री देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज नेत्यांना खूष करण्याचा हा प्रयत्न होता.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
अखेर मंत्र्याचा मुलगा चौकशीसाठी हजर झाला पण मागील दाराने!

माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
आरोपी पोलिसांसमोर हजर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी संपवलं उपोषण

पंजाब काँग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ वाद सुरू होता. अमरिंदरससिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात संघर्ष सुरू होता. यामुळे पक्ष दोन गटांत विभागला गेला. सिद्धू हे प्रदेशाध्यक्ष झाल्याने अमरिंदरसिंग यांना शह बसण्यास सुरवात झाली. यातून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात झाली होती. आता अमरिंदरसिंग यांनीही पक्ष सोडण्याची तयारी केली आहे.

Related Stories

No stories found.