गुड न्यूज : सिरमची आणखी एक कोरोना लस; चाचण्यांमध्ये 90 टक्के प्रभावी - novovax covid vaccine 90 percent effective against variant of corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

गुड न्यूज : सिरमची आणखी एक कोरोना लस; चाचण्यांमध्ये 90 टक्के प्रभावी

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जून 2021

कोरोनावरील नोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन सिरम करीत आहे. या लशीच्या चाचण्यांमध्ये ती 90 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. 

नवी दिल्ली : ऑक्सफोर्ड व अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड (Covishield) कोरोना लशीचे (Covid Vaccine) उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) करीत आहेत. याचबरोबर कोरोनावरील नोव्होव्हॅक्स लशीचे (Novovax) उत्पादनही सिरम करीत आहे. या लशीच्या चाचण्यांमध्ये ती 90 टक्के परिणामकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे सिरमची कोरोनावरील आणखी एक लस भारतीयांना मिळण्याची आशा आहे. 

ही लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. याविषयी नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे की, मध्यम ती तीव्र स्वरुपाच्या कोरोना संसर्गापासून ही लस 100 टक्के संरक्षण देते. याचवेळी एकूण 90.4 टक्के संरक्षण ही लस देते. अमेरिका आणि मेक्सिकोतील 119 शहरांमध्ये या चाचण्या करण्यात आल्या. यात 29 हजार 960 जणांचा सहभाग होता. यावर्षातील तिसऱ्या आठवड्यात या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. 

कंपनी लशीचे दरमहा 10 कोटी डोस उत्पादित करणार आहे. तिसऱ्या तिमाहीअखेर हा आकडा दरमहा 15 कोटींवर जाईल. जागतिक आरोग्यव्यवस्थेवर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात ही लस महत्वाची भूमिका बजावणार आहे. जगातील स्थिती पाहता सध्याच्या काळात लशीची अतिशय आवश्यकता आहे, असेही नोव्होव्हॅक्स कंपनीने म्हटले आहे. 

हेही वाचा : सुशांत मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट

सध्या देशात तीन कोरोना लशींचा वापर होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  याचबरोबर रशियाची स्पुटनिक व्ही लसही देशात उपलब्ध आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख