अपरिपक्व नव्हे..पवारांना म्हणायचं होतं "नया है यह.." - Not immature .. Pawar wanted to say "this is new .." | Politics Marathi News - Sarkarnama

अपरिपक्व नव्हे..पवारांना म्हणायचं होतं "नया है यह.."

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

"पवार कुटुंबात काही वाद नाहीत, पवार साहेबांनी सांगितलंय, त्यावर मी बोलण्याची गरज नाही. साहेब म्हणालेत,  'पार्थ इममॅच्युअर आहे,' असं बोलले आहेत, हिंदीत त्याला काही वेगळं म्हणतात, नया है वह...,

पुणे : "पवार कुटुंबात काही वाद नाहीत, पवार साहेबांनी सांगितलंय, त्यावर मी बोलण्याची गरज नाही. साहेब म्हणालेत,  'पार्थ इममॅच्युअर आहे,' असं बोलले आहेत, हिंदीत त्याला काही वेगळं म्हणतात, नया है वह..., असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 

छगन भुजबळ म्हणाले, "या प्रकारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुखावले गेले नाहीत, आम्ही सगळं एक कुंटुंबच आहोत. कुंटुबातील लोकांना आपण असं बोलत असतो. समजावताना म्हणतो, लहान आहे, ठिक आहे. पवार साहेबांनी काही म्हटलं नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याचा हा प्रयत्न आहे. सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काहीही संबध नाही. पद्म पुरस्कार समितीवर कुणाचा घ्यायचं की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री घेतात. काही नेते यावर काय म्हणाले, यावर मला बोलण्याचा अधिकार नाही."   

सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, ही पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी काल झटकून टाकली आहे. पार्थ पवार अपरिपक्व असून त्यांच्या मागणीला कवडीचीही किंमत नाही, असे मोठे विधान पवार यांनी केल्याने चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पार्थ यांनी ही मागणी केली होती. या बाबत प्रतिक्रिया देण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे.

पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राममंदीरालाही पाठिंबा दिला होता. त्यांच्या या दोन्ही भूमीकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. मात्र, काल शरद पवार यांनी या सगळ्याला पूर्णविराम दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी पवार यांना गाठले. त्यावेळी सीबीआय चौकशीच्या मागणीबाबत बोलताना पवार म्हणाले, "मला सुशांतपेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता आहे. सीबीआय चौकशी कुणाला करायची असेल तर त्याला कुणाचा विरोध नाही."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांनी आजवर वेळोवेळी राष्ट्रवादीच्या भूमीकेच्या विसंगत भूमीका घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि मावळ लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार पार्थ पवार यांनी जय श्रीराम लिहित पाठिंबादर्शक भूमिका घेतली होती. या घटनेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याने खळबळ उडाली. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. त्या पत्रावर पक्षाचे चिन्ह नाही याकडे लक्ष वेधले आहे. लोकशाहीत वेगळे मत व्यक्त करण्याची मुभा असते असे मतही त्यांनी नोंदवले होते.
 Edited  by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख