ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडेंच्या विरोधात महिनाभरात आणखी एक गुन्हा दाखल

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका समाजातील महिलांची बदनामी करणारे लिखाण केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
non cognizable offence registered against writer bhalchandra nemade
non cognizable offence registered against writer bhalchandra nemade

जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ… या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक लिखाण करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याच महिन्यात नेमाडे यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्येही अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. 

या प्रकरणी अ‍ॅड.भरत पवार यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावरुन या लिखाणाबाबत भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अ‍ॅड. भरत पवार यांच्या तक्रारीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भा.दं. वि कलम 500, 501, 502 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणीही एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे तहसिलदार अरुण शेवाळे यांना एक निवेदन दिले आहे. त्यात ही मागणी करण्यात आली आहे. कादंबरीचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

याच महिन्यात नेमाडे यांच्याविरोधात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमाडे यांनी त्यांच्या ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकामध्ये एका समाजाबाबात आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. अ‌ॅड. रमेश राठोड यांनी ही तक्रार दिलेली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.नेमाडे यांनी त्यांचे हिंदू- जगण्याची समृद्ध अगडगळ हे पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली होती. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com