एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध नाही  :  माजी मंत्री देवकर  

एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. उलट ते पक्षात आल्यास पक्षाला राज्यात फायदा होईल, असे मत आपण पक्ष नेत्यांकडे व्यक्त केले असल्याचे मत गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केले.
2Eknath_Khadse_1 - Copy.jpg
2Eknath_Khadse_1 - Copy.jpg

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही. उलट ते पक्षात आल्यास पक्षाला राज्यात फायदा होईल, असे मत आपण पक्ष नेत्यांकडे व्यक्त केले असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केले.                     

एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशावर मुंबईत पक्षाचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. याबाबत बोलताना. देवकर म्हणाले की खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर जिल्ह्यात कोठे कोठे व राज्यात कसा फायदा होईल हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. त्यावेळीं आपणही त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघासह राज्यात फायदा होईल, असे सांगितले.  त्यांच्या प्रवेशाला माजी मंत्री यांनी विरोध केला असे सांगितले जात आहे ते चुकीचे आहे. आपण त्यांच्या पक्ष प्रवेशाला कोठेही विरोध केला नाही.      

खडसे यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले की जर एखाद्या कार्यकर्त्याने पक्षात प्रवेश केला तर त्याचा पक्षाला फायदा होतो. खडसे तर राज्याचे नेते आहेत त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात नव्हे राज्यात पक्षाला फायदा होईल. शिवाय सहकार क्षेत्रातही त्यांचा फायदा पक्षाला होईल.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत नुकतीच आढावा बैठक घेतली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार अरुण गुजराथी, डॉ. सतीश पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील उपस्थित होते.

"भारतीय जनता पक्षातील नाराज नेते एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या अफवा नेहमी असतात. पण एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीचे जुने, जाणते नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नुकसान होईल," असा निर्णय ते कधीही घेणार नाहीत," असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी  व्यक्त केले आहे.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असली तरी खडसे यांनी मात्र आपण याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे.  खडसे यांनी आपले संपूर्ण आयुष्य भाजपमध्ये खर्ची घातले आहे. महाराष्ट्रात दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी राज्य पिंजून काढले होते. शिक्षणमंत्री, महसूल मंत्री, विरोधीपक्षनेते आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.

मात्र, 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांना असे वाटत होते की आपला मुख्यमंत्रीपदासाठी विचार होईल पण, तसे काही झाले नाही. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यादिवसापासून ते नाराज होते. नाराज असले तरी ते फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महसूल मंत्री बनले. त्यांना अनेक महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही देण्यात आली होती. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. 
 
गेल्या काही दिवसापासून नाराज खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनी सामशी बोलताना खुलासा केला आहे. ते म्हणाले,की अजून मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यांबरोबर चर्चा केलेली नाही. याबाबत मी अजून कोणताही विचार केला नाही. 
 Edited  by : Mangesh Mahale


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com