माजी आमदार राजन पाटील यांचा त्या पोस्टबाबत खुलासा - No decision has been taken to contest the Assembly elections from Balraje Patil Barshi. | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार राजन पाटील यांचा त्या पोस्टबाबत खुलासा

संपत मोरे
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

बाळराजे पाटील यांनी बार्शी मधून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कसलाही निर्णय झालेला नाही," असा खुलासा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे.

पुणे : "सोशल मीडियावर बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील अशा पोस्ट व्हायरल होत आहेत, पण या पोस्टचा आणि आमचा काहीही संबंध नाही. बाळराजे पाटील यांनी बार्शी मधून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कसलाही निर्णय झालेला नाही," असा खुलासा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील अशा पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात असताना स्वतः राजन पाटील यांनी याबाबतीत खुलासा केला. त्यांनी फेसबुकवर "सोशल मीडियावर बार्शीचे भावी आमदार बाळराजे पाटील अशा पोस्ट व्हायरल होत आहेत पण या पोस्टचा आणि आमचा काहीही संबंध नाही.बाळराजे पाटील बार्शी मधून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही."अशा आशयाची पोस्ट केली आहे. 

दरम्यान सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले,"राजकारणात भावीला काहीही अर्थ नसतो. आम्ही संयमाने राजकारण करणारे लोक आहोत. पक्ष आणि पक्षश्रेष्ठी सांगतील तेच आम्ही ऐकले आहे. राजकारण शिस्त आणि संयम महत्वाचा असतो. माझे वडील, मी आणि माझी दोन्ही मुले नेहमीच संयमाचे राजकारण करत आलेलो आहोत. लोकनेते बाबुराव पाटील यांचा पुरोगामी वारसा आम्ही जपत आहोत."

"पूर्वी माझ्या मोहोळ मतदारसंघाला बार्शी तालुक्यातील 52 गावे जोडली होती. त्या गावातील लोक आजही आमच्यावर प्रेम करतात आणि आम्हीही त्यांच्यावर प्रेम करतो. आमच्यातील प्रेम कायम राहील. त्या गावातील लोकांच्या सुखदुःखात आम्ही नेहमी त्यांच्या सोबत असेन. मात्र, बाळराजे पाटील यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आमचा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावर ज्या पोस्ट येत आहेत. त्याच्याशी आमचा कसलाही संबंध नाही," असे राजन पाटील म्हणाले.

हेही वाचा : ऑनलाइन शाळा ऍप राज्यभर वापरण्याचा विचार...  
 कोल्हापूर : अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड मयुरेश पाटील यांनी तयार केलेले व सध्या कागल तालुक्‍यात कार्यान्वित असलेले "ऑनलाईन शाळा" हे सॉफ्टवेअर संपूर्ण राज्यभर लागू करण्याचा विचार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सुरुवातीला अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्‍ट म्हणून हे ऍप तात्काळ वापरणार आहे, सध्या राज्यात हे ऍप एकमेव कागल तालुक्‍यात वापरले जात असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख