राणे राऊतांना म्हणाले, "एकतरी निवडणूक लढवून दाखवा..." - Nilesh Rane criticizes Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

राणे राऊतांना म्हणाले, "एकतरी निवडणूक लढवून दाखवा..."

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

संजय राऊत यांच्या एकेरी उल्लेख करीत राणे यांनी ही टिका केली आहे. 

मुंबई : भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती  निलेश राणे यांनी काल दिली आहे. आता निलेश राणे हे सेल्फ क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी आज टि्वटरच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊत यांच्या एकेरी उल्लेख करीत राणे यांनी ही टिका केली आहे. 

निलेश राणे आपल्या टि्वटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करीत म्हणतात, "तू दिल्ली बिल्ली सोड. तुझी लायकी नाही ते सोड. तू कधी तरी एक तरी निवडणूक लढवून दाखव. एक मुंबई शहर नाही सांभाळता येत आणि वार्ता देशाच्या." या टि्वटमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

निलेश राणे हे सुरवातीपासूनच शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेऊन सोशल मीडियातून शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांच्यावर निशाना साधतात. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राणे हे नेहमीचं टिका करीत आहेत. काही दिवसापूर्वी सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लशींवरून टिका केली होती. राऊत यांच्या टिकेला निलेश राणे यांनी उत्तर दिले होते. 

संजय राऊत यांनी लॅाकडाउनच्या काळात आपला पेटीवादनाचा जुना छंद जोपासला होता. त्यांनी या पेटीवादनाचा व्हिडीओ सोशल मिडियात शेअर केला होता. राऊत यांचे पेटीवादन पाहून त्यांचे जुने विरोधक निलेश राणे भडकले होते. राऊत यांच्या पेटीवादनाचा खालच्या पातळीवर जाऊन राणे यांनी समाचार घेतला होता. राऊत यांच्या वाक्यावर किंवा कृतीवर निलेश राणे हे आपलं निषेधात्मक मत नोंदवतात.
 
निलेश यांनी काल ट्विट करीत आपणास कोरोना झाल्याचे म्हटले आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असे आवाहनही निलेश राणे यांनी केले आहे. 

Edited  by : Mangesh Mahale   

हेही वाचा : खासगी रुग्णालयातील लुट; भाजप करणार तपासणी

मुंबई : शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट चालत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून असून यासंदर्भात सर्वच खासगी कोविड रुग्णालयांचा लेखाजोखा घेण्यात येईल, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे सांगितले. कुर्ल्यातील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अग्नीशामन दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला सतरा लाख रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्यामुळे दरेकर तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी तेथे जाऊन पहाणी करण्याचा निर्णय घेतला. हे समजताच हे बिल तेरा लाखांपर्यंत कमी करण्यात आले. ही लूट थांबविण्याचे आवाहन दरेकर यांनी केले असून याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख