कोरानामुळे 'येथील' निवडणूक लांबणीवर... - New Zealand election postponed due to Korana  | Politics Marathi News - Sarkarnama

कोरानामुळे 'येथील' निवडणूक लांबणीवर...

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या सध्या 1271 झाली आहे. त्यात 69 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

ऑकलंड : न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. न्यूझीलंडमधील रुग्णांची संख्या सध्या 1271 झाली आहे. त्यात 69 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने येथील सर्वसाधारण निवडणुका चार आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आल्या असल्याचे प्रशासनाने जाहीर केलं आहे. 

जूनमध्ये कोरोनाला हरवून ही लढाई जिंकणारा न्यूझीलंड हा पहिला देश बनला होता. त्यानंतर 102 दिवसांनंतर गेल्या आठवड्याच्या सुरुवातीपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात न्यूझीलंडमध्ये नव्या 13 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. जूनमध्ये हा देश कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केलं होतं. त्यानंतर पुन्हा येथे कोरोनाचे रूग्ण वाढल्यानं चिंता वाढली आहे. 
 
ऑकलंड परिसरात पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी अलर्ट 3 लॉकडाउन आणि अन्य ठिकाणी अलर्ट 2 लॉकडाउन घोषित करुन 26 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाउन 12 दिवसांचा आहे. मार्चच्या अखेरपर्यंत न्यूझीलंडमध्ये एक महिन्यात राष्ट्रीय अलर्ट 4 स्तरावरचा लॉकडाउन केला होता.  
 

आरोग्यविषयक महासंचालक अॅशले ब्लूमफील्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सर्व नवे कोरोनाबाधित हे ऑकलंडमधील एक क्लस्टरशी संबंधित आहेत. यामधील एक मुलगा या महिन्याच्या सुरुवातील अफगाणिस्ताहून न्यूझीलंडमध्ये आला होता. सुरुवातीला तो कोरोना निगेटिव्ह होता. पण 14 दिवसांच्या क्वॉरन्टाईन पीरियडच्या बाराव्या दिवशी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. तेव्हापासून तो ऑकलंडमध्ये क्वॉरन्टाईन आहे. तर इतर 12 कोरोनाबाधित कम्यूनिटीमधील होते." 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख